पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९७) झाले, व त्यांची राजधानी बॅबिलोन शहर ही होती. हे बॅबिलोनिअन् लोक सेमेटिक- वंशाचे होते. त्यांची चित्रे आतां आपण पाहूं. सेमेटिक वंशांतील बॅबिलोनी पुरुषाचा पुतळा. हे पुतळ्याचे चित्र पाहिल्याबरोबरच मागील चित्रांत दाखविलेल्या लोकांहुन भिन्नवंशीय जातींपैकींच्या पुरुषाचे ते असल्याचे एकदम नजरेस येते. त्याचा तो सुमेरी लोकांपेक्षा रुंदांच्या मानाने लांबी कमी असलेला चेहरा, नाक मुळापासून पुढे पसरट होत आलेलें व मांसल, रुंद जेवतें, खालचा ओठ जाड हे फरक स्पष्टपणे दिसतात. याहून सूक्ष्मतेने अवयव दर्शविलेला दुसरा पुतळा ख्रिस्तपूर्व २१०० च्या सुमाराचा एका बॅबिलोनी राजाचा सापडला आहे. यांतील नाकहि वरील फोटोप्रमाणेच आहे. त्याने डाव्या हातांत धनुष्य घेतले असून उजव्या हातांत बाण घेतला आहे, डोक्याला शिरस्त्राण घातले असून, अंगांत चिलखत घातलेले आहे. त्यावरून पेशव्यांच्या चित्रांतील लांब अंगरख्याप्रमाणे अंगरखा घातलेला आहे. कमरपट्ट्याने कमर आंवळलेली आहे. याच्याहूनहि चेहऱ्याचे सर्व अवयव उत्कृष्टतेने दिसून येणाऱ्या पुतळ्याचे चित्र याखाली दिले आहे. mE हा पुतळा बॅविलोनिअन शहरांच्या अवशेषासाठी निघालेल्या अमेरिकन लोकांना विस्मिया येथे सांपडला. यांतील वाटोळे डोळे, मांसल, बांकदार व पसरट