पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाक, भरीव व जाड असा खालचा ओठ, डोक्याला बांधलेल्या वस्त्राची पद्धति, वगैरे उत्तम त-हेने व्यक्त झालेली आहेत. एक बॅबिलोनी वीर-पुरुष. याप्रमाणे सुमेरी व बॅविलानी अशा दोन भिन्न-मानव-वंशांतील माणसांचें रूप आपल्याला पहावयास मिळते. यावरून मानव-वंश-शास्त्रदृष्टया काय सिद्धान्त निघतो, हे समजण्यासाठी आपल्याला त्या शास्त्राची मूलतत्त्वे पाहिली पाहिजेत. याकरिता आपण आतां त्याकडे वळू. 'The proper study of Inankind is man' म्हणजे ' अखिल मानवजाती- बद्दल सशात्र अभ्यास करावयाचा असल्यास त्या जातीचे घटक जी मनुष्ये. त्यांचा व्याक्तिश. प्रथम अभ्यास केला पाहिजे ' असे एका इंग्रजी कवीने म्हटले आहे, ते खरे आहे अशी अनेक मनुष्ये तपासून त्यांचे गुणधर्मानुसार गट बनविणे, त्या गटांतील साधर्म्य- वैधर्म्य परीक्षुन त्यावरून त्यांचे अधिक मोठे गट बनविणे, हीच पद्धत या शास्त्रांत स्वीकारावी लागते. या शास्त्राला Ethnology अथवा मानव-वंश-शास्त्र असें नांव आहे. तथापि अशा अभ्यासापूर्वी मनुष्य जातीची मूळ उत्पत्ति कशी झाली व त्या उत्पत्तिकाळाच्या मूळ स्वरूपापासून पुढे मानवांची परिणति अथवा विकास कसकसा होत गेला, त्याचा अभ्यास क्रमशः आधी येतो. या संबंधींच्या शास्त्राला Anthropology अथवा 'मानव-विकास-शास्त्र' असे म्हणतात. या इंग्रजी