पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१००) उत्तर पहातां परिस्थिति हे त्याला अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. असे दिसून येतें.. डकवर्थ या शास्त्रज्ञाने म्हटल्याप्रमाणे 'अनेक प्रकारची भिन्न परिस्थिति मूळ मानव- वंशांतल्या भिन्न ठिकाणच्या समूहांना प्राप्त झाल्याने, त्यांच्यांत कायमचे फरक पडले.' ___या परिस्थितीत भौगोलिक परिस्थिति हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्यामुळे निरनिराळी हवा, शीतोष्णता, खाद्यपेयें. व यांमुळे उत्पन्न होणाऱ्या संवई, वगैरेंमुळे जे फरक आरंभी पडले, ते पुढे कायमचे होत गेले. त्या फरकांमुळेच पुढः मानव-वंशाच्या कायमच्या ठळक ठळक पोटजाती उत्पन्न झाल्या. तेव्हां ते फरक कोणकोणत्या गोष्टीत पडले. ते आतां आपण पाहं. १पहिला फरक शरीराच्या वर्णाचा होय. वानरापासून मूळ मनुष्यजातीची उत्पत्ति झाल्याचा सिद्धांत डार्विन्ने प्रथम जगापुढे मांडला; व पुढे त्याचा सर्वत्र स्वीकार झाला; यावरून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, मानव-जातीच्या उत्पत्तिकाळी तिचा वर्ण वांदरांच्याच वर्णाप्रमाणे-पिंगट पिवळट-असा होता. यानं- तर वर सांगितलेल्या अनेक कारणांमुळे त्यांत फरक पडत गेला. असा फरक पडण्याचे तज्ञांच्या मते कारण असे आहे की, त्वचेच्या निरनिराळ्या कोशांत ( Cells) एक. प्रकारचा रंग भरलेला असतो, व त्याचा सूर्यप्रकाशाशी व बाहेरच्या हवेशी संयोग होण्याने, त्यांचं भिन्नभिन्न रासायनिक मिश्रण बनतें; अर्थात् त्याप्रमाणे भिन्नभिन्न वर्ण उत्पन्न होतात व ते परंपरेनें व अनुवंशिकतेने कायम होतात. ज्या प्रमाणाने सूर्यप्रकाश अधिक, त्या प्रमाणानें संयोगमिश्रण अधिक काळे होत जाते. जर्मनी, नॉर्वे व स्वीडन या देशांतील लोकांना सबंध वर्षात फक्त १२५० ते १२०० तासच सर्यप्रकाश मिळत असल्याने तेथे काळ्या रंगाचे मिश्रण कमी तयार होते. म्हणून तेथील लोक गीर वर्णाचे निळसर डोळ्याचे व वेदांत वर्णन केलेल्या इंद्राच्या वर्णाप्रमाणे सोनरी वणांचे असतात. अर्थात् उत्तरध्रुवापाशी राहणाऱ्या मूळ आर्यलोकांचा वर्ण कांचनाप्रमाणे गौर होता व तो वेदांत तसा असल्याचे वर्णन केले आहे, हे युत्ताच आहे. सूर्यप्रकाशा- प्रमाणच हवेच्या आदेशुष्कतेचा परिणामहि काही अंशानें वर्णावर होतो. हवेत अधिक शुष्कता असल्यास पिवळा वर्ण उत्पन्न होतो. पिवळ्या रंगाच्या मंगोलिअन लोकांची बस्ति सपाट प्रदेशावर व शुष्क हवेच्या मैदानावर असल्याने, त्यांच्यांत पीतवर्ण बळा- वला. यासंबंधों प्रो. एल. डब्ल्यू लाइड् म्हणतात की, 'समशीतोष्ण कटिबंधांत, सपाट मैदानांतील गवत कापून टाकून तेथे वस्ती केल्याने आर्द्रता नाहीशी झालेल्या हवेमुळे, मोंगल जातींत पिवळा वर्ण उत्पन्न झाला आहे.' आफ्रिकेसारख्या सतत उन्हांत भाजणाऱ्या लोकांत सूर्यप्रकाशाच्या अतिशयामुळे वर्णमिश्रण काळे बनले आहे. अमेरिकेंतलि ताम्रवर्ण लोकांच्या तांच्यासारख्या रंगाची उपपत्ति मात्र अजून शास्त्र- ज्ञांना झाली नाही. आद्यकालीन अमेरिकन हवेची शास्त्रीय चिकित्सा अजून झाली नसल्यामुळे त्या वर्णा! उपपत्ति अजून लावता आली नाही, असे शास्त्रज्ञ म्हणतात, २ वर्णानंतर मनुष्यजातीच्या पोटभागांत पडणारा फरक डोक्याचा अथवा