पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० (१२९) ७/// लागता, अखेर त्या वनलेप झाल्या व मग त्यांच्यांत नवीन भर पडेनाशी झाली. अशा या वनलेप झालेल्या आख्यायिकांचा खरा अर्थ तत्कालीन परिस्थितीच्या सत्य ज्ञानानेच समजण्यासारखा असतो व म्हणून हिंदी व सुमेरी लोकांत प्रचलित असलेल्या आख्यायिकांचा अर्थ लावून वर म्हटल्याप्रमाणे त्यांच्या कालस्थलाचा निर्णय करता आला आहे. या एकवंशीयत्वामुळेच या मालेतील लेखांकांत वर्णिल्याप्रमाणे या उभय समाजांत आख्यायिका, आचारविचार, देवता, धार्मिक समजुती. शास्त्रीयज्ञान- फलित व गाणत असें उभय प्रकारचे ज्योतिष, कलाज्ञान, वेशपद्धति, इत्यादि अनेक प्रकारचे ऐकांतिक सांस्कृतिक साम्य प्रतीत होते. या एकंदर अध्ययनाने गतकालाच्या इतिहासज्ञानाचें क्षितिज किती तरी दूर गेलें आहे! असो. प्रथमतः एका लेखांकाच्या मर्यादेचे मानसिक नियंत्रण घातलेले विवेचन इतके लांबले पण त्यामुळेच या विषयाचा सर्वांगांनी विचार करतां आला. तो करण्यांत मनास एक प्रकारचा आनंद वाटतो. म्हणून अशाच अर्थाचे उद्गार मि. वडेल यांनी काढले आहेत ते देऊन या विषयाचा आपण समारोप करूं.डेल म्हणतातः- There is after all a real, if not very often attained pleasure in helping on the progress of the world, without hope of added reward in promoting by researches into what has been happening in the past-the longdrawn effort. of our race towards a higher level of health and happiness...... For in all true progress... The message for the Future ___Is the message of the past. आपल्या वंशाच्या प्रार्चान पूर्वजांनी 'आयुरारोग्यैश्वर्याभिवृद्धधर्थ' जे दीर्घ प्रयत्न केले त्यांचे संशोधन कोणत्याहि लाभाची अपेक्षा न ठेवता करण्याने सांप्रत- कालीच्या जागतिक प्रगतीला आपण मदत करीत असल्याने, अशा संशोधनानें एक प्रकारचा सात्विक आनंद होतो. कारण खऱ्या प्रगतीच्या दृष्टीने पाहिले असता, भूतकालाचे सत्यज्ञान हाच भविष्यकाळचा संदेश होय, (समाप्त)