पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी व सुमेरी इंद्र. ध व पंजाब या प्रांतांतील भूगर्भशोधनाने आविष्कृत केलेल्या अत्यंत प्राचीन हिंदी संस्कृतीचे स्वरूप दाखवून, प्राचीन सुमेरियन संस्कृतीशी तिचें किती निकट साम्य आहे. याचें दिद्र्शन 'चित्रमय जगत् । च्या जानेवारीच्या खास अंकांत AJI केले आहे. या दोन्ही प्रदेशांतील इमारती, चित्रे, पुतळे, अलंकार, हत्यारें, शिक्के, त्या शिक्कयांवरील लिपि, त्या लिपीच्या वाचनाने प्राप्त झालेल्या माहितीवरून कळून आलेली त्यांची सामाजिक, राजकीय व धार्मिक स्थिति याने गणित व फलित या दोन्ही शाखांतील ज्योतिषविषयक ज्ञान व त्यांच्यांतील देवतात्मक ज्ञान, इत्यादि अनेक वावतींचा अभ्यास करतांना या दोन्ही संस्कृति सम- कालीन असल्या पाहिजेत हे उघड होते, असे त्या लेखांत दाखविले होते. हा काल अधिकांत अधिक ख्रिस्तपूर्व सहा सात हजार वर्षांपूर्वीपर्यंत जाऊन पोहोचतो असें अंतर्गत उल्लेखांवरून निष्पन्न होते, व हेच अनुमान भारतीय वेदांबद्दल कै. लो. टिळ- कांनी काढले होते, असेंहि त्या लेखांत दाखविले होते. ज्या लोकांत या दोन्ही संस्कृतींचा प्रचार चालू होता, ते कोण होते ही जिज्ञासा पुढे ओघानेच प्राप्त होते तिचें उत्तर मि. वेंडेल यांनी असे देण्याचा प्रयत्न केला आहे की The Indo-Aryans who conquered, colonized and civilized India ...... were those leading sea-going branches of the Aryan sumerians. " या लोकांचा वंश सुमेरियांत असून पुढे तिचीच शाखा हिंदुस्थानांतील आर्य, ही होय. अर्थात् सुमेरिअन संस्कृति त्यांतल्या त्यांत प्राचीन व आर्यसंस्कृति तिची शाखा. म्हणून अर्वाचीन, हे मि. वेंडेल यांचे अनुमान युरोपिअन लोकांच्या देहस्वभावानुसार वेलेलें आहे. असें मी मागील लेखांत म्हटले आहे. वस्तुतः युरोपिअन लोकांची प्रवृत्ति आर्य- संस्कृति शक्य तितकी अर्वाचीन ठरविण्याची असते. ही गोष्ट अनेकांनी अनेक ठिकाणी नमूद केलेली असता, मागील लेखांतील माझ्या विधानांत काही जणांना यरोपिअन लोकांच्या प्रयत्नांबद्दल नुसता कृतज्ञताभावच नव्हे, तर उपहासहि असल्याचा भास झाला. पण तो भास चुकीचा आहे. कारण मी जे विधान केले आहे, त्याला चमत्का- रिक रीतीने सर जॉन मार्शल यांचीच पुष्टि मिळाली आहे. ता. ४ जानेवारीच्या 'टाइम्स' च्या अंकांत मार्शलसाहेब म्हणतात:--