पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"owing to its close connection with the Sumerian civilization of Mesopotemia, the prehistoric civilization revealed at Mohenjo-daro and Harappa has hitherto been designated by the name - Indo-sumerian. ' With the progress of exploration, howerer. it has become evident, that the connection with Mesopotemia was due not to actual identity of culture, but to intimato commercial or other intercourse between the two countries. For this reason the term ' Indo-Sumerian has been discarded and ' Indus ' adopted in its place. " ( मेसापोटेमियांतील सुमेरिअन संस्कृतीचें पंजाब, व सिंधमधील संस्कृतीशी असलेल्या निकट साम्यावरून या संस्कृतीस 'इंडो-सुमेरिअन' असें नांव आजपर्यंत उपयोजिले होते परंतु हिंदुस्थानांतील उत्खनन जसजसे अधिक अधिक होत जात आहे. तसतसें हे अधिक सिद्ध होत आहे की, या दोन्ही संस्कृतीत तादात्म्य नसून फक्त व्यापा- रादि संबंधामुळे अत्यंत साम्य प्रतीत होते, इतकेंच; व याचसाठी इतउत्तर हिंदुस्था- नांतील संस्कृतीला 'इंडो-सुमेरिअन' या संज्ञेने न संबोधितां सिंधु ( नदप्रांतीय) असे संबोधण्यात येईल.) अर्थात् या मार्शलसाहेबांच्या अभिप्रायाने वडेलसाहेबांचें अनुमान बाधित होते, हे उघड आहे, व म्हणूनच त्या विधानावर आम्ही आक्षेप घेतला होता. अर्थात् या आक्षेपांत कृतज्ञताभाव अथवा उपहास वगैरेंचा भास कल्पणे चुकीचे होय. असो. आमच्या मते मि. बॅडेल यांचे विधान चुकीचे आहे व सर जॉन मार्शल यांचे विधान हे अर्धसत्य आहे. वडेलसाहेबांच्या मतें सुमेरिअन लोकांच्या ज्या शाखेनें हिंदुस्थानावर स्वारी करून आपली शाखा हिंदुस्थानांत स्थापिली, त्या शाखेनें स्त्रि. पू. ७०० च्या सुमारास ही स्वारी केली; पुढे याच लोकांत उपनिषदें, स्मृति वगैरे ग्रंथ त्यानंतर झाले. व त्याच लोकांत भारतीय युद्ध त्यानंतर झालें. अर्थात हे विधान चकीचे आहे. हे सांगण्यास फारशी हरकत येण्यासारखी नाही. मार्शलसाहेबांचे विधान इतक्यापुरतें सत्य आहे की, हिंदुस्थान व मेसापोटेमिया या दोन देशांत रिन. पू. चवथ्या व तिसऱ्या सहस्रकांत दोन भिन्न संस्कृति होत्या; एक दुसरीची शाखा नव्हती. परंतु त्यांच्यांतील साम्य व्यापारादि निकट संबंधामुळेच आलेले होते, हे मार्शलसाहे- यांचे विधान बरोबर नसून, वस्तुतः मेसॉपोटोमिया व हिंदुस्थान यांच्यातील संस्कृति साम्य असण्याचे खरे कारण या दोन्ही शाखा उत्तर ध्रुवप्रदेशीय एका संस्कृतीच्या- शाखा आहेत, व त्यामुळे त्यांच्यांत हे विलक्षण साम्य दिसून येत आहे. या उप- पतीच्या समर्थनार्थ या लेखांतील विवेचन योजिले आहे. लो. टिळक यांनी आपल्या 'आर्टिक होम इन् दि वेदाज्' या ग्रंथाच्या आरंभींच म्हटल्याप्रमाणे “ कोणत्याहि राष्ट्राच्या पूर्वपीठिकेचा मागोवा काढतां काढतां अखेर आपण त्या राष्ट्राच्या पौराणिक आख्यायिका व दंतकथापर्यंत जाऊन पोहोचतों.