पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व त्या आख्यायिका व दंतकथांतच त्या राष्ट्राचा प्राचीनतम इतिहास सांठविलेला असल्याने त्यांच्या सत्य अर्थप्रतांतीनंच तो उपलब्ध होतो." प्राचीन ज्ञानप्राप्र्माचा हा दंडक यथार्थ आहे व तो लावूनच आजपर्यंत अनेक देशांच्या इतिहासाची कोडी उलगडता आली आहेत. तो दंडक भारतीय वेदकथांना लावून आर्यवंशाच्या इति- हासाचा छेडा लावण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. भारतीय वेदकथांत इंद्रकथांना अत्यंत महत्त्व देण्यांत आले आहे, व तसेंच इंद्र या देवतेला सर्व देवतांत प्राधान्य देण्यात आले आहे. इतर सर्व वैदिक देवतांपेक्षा इंद्रविषयक सूक्तांची संख्या किती तरी पट अधिक आहे ! इंद्र ही भारतीयांची राष्ट्रीय देवता होय.अनेक सूक्तांतन इंद्राचे वर्णन केलेले आहे. त्यांत त्याची उत्पत्ति, बाळपण, रूपवर्णन, गुणवर्णन व त्याचा मुख्य पराकम जो बुत्रवध, त्याचे वर्णन केले आहे. या इंद्रविषयक कथेचा अनेकांनी अनेक रीतीने अर्थ करून भारतीयांच्या इतिहासाबद्दलच्या आपल्या उपपत्ति कल्पिल्या आहेत त्याचपेकांच्या पूर्वीच्या सर्व उपपत्तींचा विचार करून त्या कशा असमाधान कारक आहेत, हे लो. टिळकांनी दाखविले आहे, व उत्तरध्रुवदेशीय आर्यवस्तीच्या उपपत्तीने या कथेचा समर्पक खुलासा कसा होतो, हूँ आपल्या ग्रंथांत दाखविले आहे. _ अर्थात् ही इंद्रविषयक कथा जर सुमेरियन् वाटायांत अगदी तंतोतंत एक. सारखी आढळली, व इंद्रविषयक सर्व गोष्टींचे प्रतीक जर त्या सांस्कृतिक वाडायांत आढळलं, तर अर्थात् दोन्ही संस्कृतीचा मळ एक उद्गम असला पाहिजे हे उघड होते. पुढे ध्रुवप्रदेशी नि. पू. अजमासे आठ हजार वर्षांपूर्वी हिमालय झाला, तेव्हां तेथून आर्यलोकांनी स्थलांतर केले व त्यांच्यांतील काही लोक मुमेरियांत गेले व कांहीं हिंद स्थानांत आले. हिंदुस्थानांतील सिंध व पंजाब येथील लोकांवर आयोनी स्वारी केली व त्यांच्या व आपल्या चालीरीतींचा परस्पर-विनिमय केला. ही गोष्ट स्वि. पू. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी झाली, व आर्यावर्तातील मूळचे लोक व आलोक यांच्या संसाचाच परिणाम नवीन उत्खननांत दिसून येत आहे. या उत्खननांतील शहरांचा काळ मार्शल साहेबांनीच त्रि. पू. ३५०० वषाचा ठरविला आहे, तो वरोवरच आहे. त्यापूर्वी काही शतके आयलोक हिंदुस्थानांत आले होते. अथात् हा काळ मृगनक्षत्र वसंतसंपात असल्याच्या वैदिक उद्वेखांशी अगदी मिळतां येतो. याच्याहि पवीच्या काळाचा--पुनवसंत संपात असल्याच्या काळाचा उल्लेख वेदांत प्राचीन म्हणून केलेला आहे. म्हणजे संपातांत दोन नक्षत्रांइतका फरक पडलेला आहे. इतका फरक पड. ण्यास, दर नक्षत्रास अजमासें ९५० वर्षे याप्रमाणाने, १९.. अथवा दोन हजार वर्षांचा काळ जावा लागतो. अर्थात् वेदांचा अगदी आधोद्गम लि. पू. सहा साडेसहा हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्या काळी भारतीय आर्य व मेसोपोटोमअन् अथवा समेरि- यन् आर्य उत्तरध्रुवाजवळ रहात होते, व त्यांच्यांत त्या काळी ज्या देवतात्मक दंतकथा होत्या. त्या स्वाभाविकच त्यांनी आपल्यावरीवर आणल्या. अशी ही एकंदरीने आमची विचारप्रणालिका आहे. तिचा प्रपंच आतां करावयाचा आहे. .