पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हैं करितांना त्यांच्या मनाने त्या देवांचे अस्तित्व लाक्षणिक रूपानें, कल्पिलेलें नसून ते वास्तव रूपाने होते. " अशा या देवतांमध्ये भारतीय दृष्ट्या इंद्र ही देवता मुख्य आहे. . भारतीय वेदांत ज्याप्रमाणे. इंद्राला प्रमुख स्थान आहे, त्याप्रमाणे सुमेरियन वाङ्मयांत आद्यस्थान असलेली देवता मर्डक ही होय. वस्तुतः वेदांच्या अंगदी आध काळी हे प्रमुखपद वरुण या देवतेला होते. वरुण हा " उदारधी, श्रीमान् ,शांत, पुण्य- पावन व सर्वांवर प्रभुत्व गाजविणारा असा आहे." वरुणाला 'तूं संवाचा राजा आहेस' (त्वं विश्वेषां वरुणासि राजा। ऋ.), 'तो सर्व भुवनांचा राजा आहे , ( तेन विश्वस्य भुवनस्य राजा । .). 'तो गंभीर, पराक्रमी, क्षत्रिय व अस्तित्वांत असलेल्या सर्व वस्तूंचा राजा' (गंभीरशंसो रजसो विमानः सुपारक्षत्रः सतो अस्य राजा । श्रा.) असे म्हटले आहे. त्या काळी वरुण हा राजा व इंद्र त्याचा सेनापति मानला जात असे. त्या विभ्राजमान इंद्र व वरुणांना नमस्कार करा: त्यातला पहिला बनाने वृत्राला मारतो व दुसरा विप्न हा धरी वसतो' (ता नृणीहि नमस्येभिः शरैः सुन्नेभिः इंद्रावरुणा चकाना । वज्रेणान्यः शवसा हंति बुत्रं सिषतयन्यो बुजनेषु विप्रः +) पण पुढे वरुणाचें हें सम्राटपद इंद्राकडे आले. ( सत्यानृते अवपश्यन जना- नाम् ) जनांचे सत्यासत्य अवलोकन करणान्या वरुणापेक्षां पराक्रमाने वृत्राचा नाश करणारा इंद्रच त्या कालच्या विजिगीषु आयांना अधिक पटला. याचे प्रत्यंतरहि वेदांत दिसून येते. ऋग्वेदातील एका सूक्तांत अग्नि हा असे म्हणतो की, “पुष्कळ वर्षे मी माझ्या पूर्वीच्या धन्याला (वरुणाला). सोडले असून, माझा हल्लीचा बनी इंद्र आहे.' (बलीः समा अकरमंतरस्मिन् इंद्रं वृणानः पितरं जहामि । ऋ. ) इंद्राच्या पराक्रमामुळे हतप्रभ झालेल्या वरुणाला त्याचे परिजनहि सोडून जातात, हा प्रकार मुद्राराक्षस नाटकांतील राक्षसाने काढलेल्या उद्गाराप्रमाणेच आहे. तो: म्हणतो:- उच्छिन्नाश्रयकातरेख वुलटा गोत्रांतरे श्रीर्गता। तामेवानुगता गतानुगतिकास्त्यक्तानुरागाः प्रजाः ॥ " हतबल झालेल्या राजाला त्याची श्रीच केवळ सोडून गेली, असें नन्हे; तर तिच्या मागून अनुरक्त असलेले प्रजाजनहि सोडून गेले."

  • अथवा इंग्रजी कवि टेनिसन्ने आपल्या मॉर्ट डः आर्थर या काव्यांत म्हटल्या-

प्रमाणे Authority forgets adying king, laidwidowed Of the power in his eye, that bowed the will. नुसत्या डोळ्यांतल्या चमकेने दुसऱ्यांची शिरें नमविण्याचे सामर्थ्य नष्ट झालेल्या दुर्बल राजाला अधिकारश्रीहि सोडून जाते. हाच प्रकार सुमेरी वाड्मयांत दिसून येतो. फार प्राचीन काळी वेल या देवते-