पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्थात् खिन्तपूर्व सहा सात हजार वर्षांपूर्वीचा काळ हाच पुनर्वसूत वसंतसंपात असल्याचा प्राचीन काळ असल्याबद्दल ऋग्वेदांतील संदर्भ दाखवितात. तेव्हां अर्थात् या कालसाम्याने दोन्ही वाङमयांतील इंद्रकथेत वर वर्णन केलेले वृत्तसाम्य सहज प्रतीत होतेंकेवळ व्यापारादि दळणवळणाने असें विलक्षण साम्य येणे अशक्य आहे; एकाच ठिकाणी वास करीत असलेल्या एकजातीय समाजामुळेच त्यांच्या नंतर विभागलेल्या भागांत ते येऊ शकले. या दृष्टीने बविलोनिअन् लोकांचे पूर्वगामी भुमेरी आर्य व वेदांतील भारतीय आर्य हे एकच होते व ते एकाच ठिकाणी रहात असले पाहिजेत हे अनमान सहज निघते. तथापि हें विधान केवळ अनुमाननिष्टच न ठेवितां त्याचा प्रत्यक्षात्मक पुरावा आपल्याला मिळाला असतां आपले विवेचन निश्चयात्मक होईल, म्हणून वरील कर्यत तसा पुरावा काय मिळतो याचें आतां आपण परीक्षण कर. वृत्रहननाच्या कथेला वेदिक वाङ्मयांत इतकें विलक्षण महत्त्व दिलेले आढळतें की तिच्या तुलनेलाहि दुसऱ्या कोणत्या कथा राहू शकत नाहीत. यावरून तो प्रसंग म्हणजे वैदिक ऋषांना अत्यंत महत्त्वाचा वाटत होता हे उघड आहे, व म्हणून त्याचा खरा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. आतां प्रथमारंभी ही कथा म्हणजे एक तर यथोक्ति आहे अथवा रूपक आहे, असे तिच्या अर्थाचे दोन भाग पडतात. त्यांपैकी पहिली कल्पना कथेवरूनच उघड उघड असंभाव्य ठरते. इंद्र म्हणून कोणी तरी आयोचा प्राचीन वीरपुरुष असेल व त्याने वृत्रासारख्या एखाद्या आर्यशत्रूला मारले REME Seaseeroort [एदिन ( सिंधुनदप्रांत ) चा राजा हर्यश्व याचा मुख्य प्रधान मुद्गल याची अधिकारमुद्रा. ( काल रिन. पू. ३१०० वर्षे) अशाच प्रकारचा एक शिका सुमेरि- यांतही सांपडला आहे. त्यांत मुद्गल असें नांव आहे.] असेल व त्यामुळे त्याचा अपूर्व गोरख या कथारूपानें केला असेल हे मानणे, त्यांर्ताल ऋतुमानविषयक उल्लेखांवरून अशक्य आहे. अर्थात् हे एक रूपक आहे, असे निष्पन्न होते. तर मग या रूपकाचा अर्थ काय ? या प्रश्नाचे उत्तर खि. पू. १००० च्या सुमारास झालेल्या निरुक्तकार यास्काचार्यापासून तो तहत आतापर्यंत, देण्याचा प्रयत्न