पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनेकांनी अनेक रीतीने केला आहे. यास्काचार्य स्वतः म्हणतात, “ हा बुत्र म्हणजे कोण आहे ? नरुक्त म्हणतात, तो मेघ आहे. ऐतिहासिक लोक म्हणतात, तो एक असुर होय मंन व ब्राह्मण यांत तो एक महासर्प आहे असे म्हटले आहे. आकाशस्थ जल च विटालता यांचे मिश्रणाचा जो परिणाम तो लक्षणेने या कथेत वर्णिला आहे" वरील मतांपैकी ऐतिहासिकांचे मत चुकीचे आहे. तेन्हां यास्कांनी दिलेला खुलासा चरोबर आहे किंवा नाहीं तें आतां पाहिले पाहिजे. या एकंदर रूपकाचे परीक्षण लोक टिळकांनी आपल्या Arctic lone in the Vedas या ग्रंथाच्या The captive waters' या प्रकरणांत केले आहे. ते म्हणतात, वृत्रयुद्धाविषयक एकंदर वैदिक वाड्याय तपासतां वृन्नाशी झालेल्या इंद्राच्या युद्धाचे जे मुख्य परिणाम आलेले आढळून येतात, त्यांत इंद्राने त्राला मारून जलांची मुक्तता केली हा जसा परिणाम वर्णिला आहे, त्याचप्रमाणे प्रकाशाची मुक्तता हाहि दुसरा परिणाम वर्णिला आहे पहिला परिणाम हा यास्काचार्यांनी विचारांत घेतला. हिंदुस्थानचे ऋतुमान एका विशेष प्रकारचं आहे येथील वर्षाचे साधारणतः उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे तीनच आग पडतात. त्यापैकी उन्हाळ्यांत भयकर उप्मा होऊन देश अगदी त्रस्त होऊन जातो अन्न हे पर्जन्यवृष्टीवर अवलंबून असल्याने व ती पावसाळ्याशिवाय होत नस- त्याने पावसाकडे लोकांचे डोळे लागून राहिलेले असतात. उन्हाळ्याच्या अखेरीस मेघ येऊ लागतात; परंतु पावसाळ्याच्या तोंडा जेव्हां त्यांच्यांत विहिता उत्पन्न होऊन गड- गडाट होऊन मोठी घनचक्कर होते, तेव्हां कोठे पाऊस पडतो ! अर्थात् मेघांनी आकाश व्याप्त होऊन सर्वत्र अवर्षण पडते की काय अशी भीति वाटते, त्याच स्थितांचे वर्णन रूपकाने वृत्राने जल कोंडून ठेवल्याच्या कथेत केले आहे. व जेव्हां सोसाट्याचा वारा सटन वीज चमकून पाऊस पडतो, तेव्हां जलदेवता जी इंद्र त्याने मरुतांच्या साह्याने हातांत विद्युल्लतारूपी बन घेऊन वृत्रहनन केले, असे मानण्याच्या स्वरूपाचा या कथेचा उत्तरार्ध आहे. परंतु हा खुलासा टिळकांच्या मते बरोबर नाही. प्रतिवर्षी पाऊस हा पडतोच अगदी अनेक वर्षांनी एखादे वेळेस अवर्षण पडते, तेव्हांच पाऊस पडण्याचे अपूर्व महत्त्व असेल. शिवाय अवर्षणाच्या वर्षी अगदी विलकूल पाऊस पडत नाही, असे थोडेंच होने ? कमी पडतो, एवढेच. तेव्हां काही झाले तरी पावसाळ्याच्या आरंभाच्या थोड्या दिवसांच्या तापांतून होणाऱ्या मुक्ततेस इतकं महत्त्व दिले गेले असणे शक्य नाही. पण हा पराक्रम तर अपूर्व म्हणून वेदांत वर्णिला आहे. किंबहुना महाभारतांत ह्याविषयी असे म्हटले आहे की, 'इंद्रो वृत्रवधेनैव महेंद्रः समपद्यत । ___महेंद्र प्रग्रहं लेभे लोकानां चेश्वरोऽभवत् ॥ वृत्रवधामुळेच इंद्राला महेंद्र ही संज्ञा प्राप्त झाली, व त्याबरोबरच तो त्रैलो- 'क्याचा राजा झाला तेव्हां या उपपत्तीने हवा तो खुलासा होत नाहीं