पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपपत्तीत प्रकाश व सूर्य लुप्त झाले असण्याचे व पाऊस पडल्यावरोवर ते मुक्त होत असण्याचे काहीच कारण नाही. अर्थात ही अडचण वादळाच्या कल्पनेने सुटण्यासारखी नाही, व म्हणून जलप्रवाह व प्रकाश ही दोन्ही एकाकाळी बद्ध असून पुढे मुक्त होतील असा खुलासा होईल अशी जी उपपत्ति असेल तीच ग्राह्य मानली पाहिजे. याशिवायहि आणखी दोन परिणाम वृत्रहननाबरोबर घडून येतात असें वैदिक कथेवरून दिसून येते. ते परिणाम (१) उषेची प्राप्ति व (२) गाईची प्राप्ति हे होत. परंतु या ठिकाणी या विषयाचें सबंध विवेचन करावयाचे नाही. कारण मूळ प्रतिपाद्य विषय तो नाही. सुमेरी व हिंदी कथांत जितके साम्य दिसून येत आहे तेव- ट्याचे विशदीकरण करण्याचाच ह्या लेखाचा मुख्य हेतु असल्यामुळे वर नमूद केलेल्या शेवटच्या दोन परिणामांसंबंधाने येथे विवेचन करण्याचे कारण नाही. म्हणून फक्त पहिल्या दोन परिणामांसंबंधाने पाहू लागलो. तर हिंदी व मुमेरी दोन्ही कथांत पूर्ण साम्य असल्याचं दिसून येते. बुत्र मारल्याबरोबर जलप्रवाह मोकळे झाले व सूयाद्वार प्रकाशाची प्राप्ति झाली हे जसे भारतीय कथत स्पष्ट रीतीने दिले आहे, त्याचप्रमाणे नेमातला मारल्यावरोवर मर्डकनें जल मोकळे केले व प्रकाशहि मुक्त केला, असे सुमेरी कथंतहि दिले आहे. तेव्हां याचा खुलासा कसा होतो ते पाहिले पाहिजे. या संबंधानें, कै. टिळक यांनी अशी उपपत्ति बसविली आहे की, उत्तरध्रुवापाशी वस्ति असणाऱ्या लोकांसंबंधानेच हे चमत्कार वणिले आहेत. नि. पू. सुमारे आठ हजार वर्षापूर्वी उत्तरधुवाजवळील प्रदेशांतील हवा मनुध्यवस्तीला रहाण्याला लायक अशी होती. त्या ठिकाणी पृथ्वीभोवती फिरणारा सूर्य आपल्याप्रमाणे एका बाजूच्या क्षितिजावर उगवून डोक्यावरून जाऊन दुसऱ्या वाजूकडे सायंकाळी मावळतो, असा प्रकार Seal Stonerian Phonetic OF SA, SAB TAR EDIN-A वाचनः-सवितर-एदिन्-अस्स. अर्थ-एदिन् । सिंधुनदप्रांत ) चा सविता ( याची मुद्राही) आहे. घडून येत नसून तो वर्षांतून काही महिने आकाशांतच चक्राकार फिरत रहातो. व इतर महिन्यांतून पृथ्वीखाली तसाच चक्राकार फिरतो. ज्या महिन्यांत तो आकाशांत वाटोळा फिरतो. त्या महिन्यांत तो दिवसाचे चो सहि कलाक दिसत असतो. हाटीहि नॉर्वेसारख्या उत्तर सीमेवरील प्रदेशांत हा चमत्कार दिसून येतो व म्हणून त्या देशाला Land of the midnight-sin — मध्य रात्रीच्या सूर्याचा देश' असे म्हणतात.