पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परंतु नचिकेतानें गिल्गमेशप्रमाणेच हे सर्व नाकारले व 'बरस्तु मे वरणीयः स एव ।' मी मागितलेला अमृतत्वाच्या ज्ञानाचाच वर मला द्या, असा आग्रह धरला हे विचारसाम्यहि फार उद्बोधक व मनोरंजक आहे. इतका आग्रह धरल्यामुळे अखेर सबितूने त्याला वैतरणीपार जाण्यासाठी माने दाखविण्याचे कबूल करून त्याला सांगितले:- या कामी आराद-इआ म्हणून एक यक्ष आहे. त्याच्या जवळ एक नांव आहे. तींतून तो तुला नदीपार घेऊन जाईल. यासाठी तूं त्याच्याकडे जा. त्याप्रमाणे गिल्गमेशने आराद-इआकडे जाऊन त्याची प्रार्थना केल्यावर आराद-इआने आपली नांव तयार केली व तीत बसून दोघेजण - River of Death' अथवा मृत्युनदीतून पलीकडे असलेल्या ' Island of the Blessed सुखद्वीपा' ला जाऊन पोहोचले. परंतु ते त्या नावेतच बसून राहिले तेथनच गिलगमेशने आपला प्राचीन पितर पीर-नापिरितम् व त्याची पत्नी यांना अवलोकन केले. पीर-नापिरितहिं सदेह मनुष्य नौकेतून येतांना पाहून आश्चर्य. चकित झाला व त्याने गिलगमेशला त्याच्या येण्याचे कारण विचारलें. तेव्हां गिलं. गमेशने त्याला एकंदर हकिगत सांगितली व आपला मित्र इआ-बनी याच्याप्रमाणे आपल्याला मृत्यू न यावा असा उपाय सांगण्याबद्दल पीर-नापिरितमूला विनंति केली. REPARAT Pा नावेचे चित्र. चित्रांत उजव्या हाताच्या अर्ध्या भागांत एक नांव दाखविलेली असून त्यांत गिलगमेश बसलेला आहे व आराद-इआ हातांत वल्हें घेऊन नांव चालवीत आहे. डाव्या बाजूचे चित्र निराळ्या प्रसंगाचे असून ते केवळ एकाच चित्रांत कोरलेले आहे. त्यांत गिलगमेश सिंहाशी लढत असल्याचे दाखविले आहे. 15 ही सर्व हकीगत ऐकून आपल्याला खेद होत असल्याचे परिनापिरितमा गिलगमेशला सांगितले; पण तो म्हणाला 'तूं म्हणतोस ते होणे शक्य नाही. दरेक मनुष्याला मृत्यु हा निश्चित झालेला आहे, तो टळणे शक्य नाही. इतकेच काय, पण मृत्यू केव्हां येईल हेहि सांगता येणार नाही. कारण त्याचा काळ देवांनी नक्की केलेली असतो. तेव्हां गिल्गमेशन परि-नापिदितभूला विचारलें:-'तर. मग आपण स्वतः मृत्यूच्या अतीत कसे झाला?...