पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लंकापति राक्षसराज रावणाने पळवून: नेलेल्या रामपत्नी सीतेच्या शोधार्थ हनुमान् या देवाने केलेला प्रवास, यांच्यांत विलक्षण साम्य आहे. ) यावरून त्याने असा निष्कर्ष काढला आहे की, Here as elsewhere, the priests ntilized the floating material irom which all mythologies were framed, and impressed upon it the stamp of their doctrines. ( सर्वत्र प्रचलित असलेल्या दंतकथेच्या वाङ्मयावर धर्मगुरूंनी आपल्या मतांचा शिक्का मारून त्याला हलांचे स्वरूप दिले आहे.) _ हा सिद्धांतहि बहुमान्य होण्यासारखाच आहे. केवळ उदरपूरणाकरितां यांनी केलेली ही लोकांची फसवणूक नव्हे, तर प्राचीन काळच्या ऐतिहासिक वाडायाचें त्यांनी आपल्या बुद्विवैभवाने केलेले हे स्थिरीकरण होय. माहेंजोदारो व हरप्पा येथील उत्खननांत सांपडलेल्या शिक्कयांपैकी काही सर्य- वंशांतील राजांचे आहेत, हे त्या शिकथांचे जे वाचन या मालेतील लेखांतून दिले आहे. त्यावरून वाचकांच्या ध्यानात आलेच असेल, त्या शिक्कयांचा काळ मार्शल- माहेबांनी जि. पू. ३५०० ते २७०० चा ठरविला आहे. आपल्याकडील पुराण- वंशावळीच्या अध्ययनावरून पार्जिटर बगैरेंनी जो कालनिर्णय केला आहे, त्यांतहि सूर्यवंशी राजांचा काळ याच सुमाराचा साधारणतः येईल. त्यावेळी सुमेरिया व सिंधुप्रांत यांत दळणवळण असल्याचे आतां मार्शल साहेबांनीहि सिद्धच मानले आहे. तेव्हां दोही देशांच्या पौराणिक कथावाडायाचा थोडाबहुत परस्परविनिमय झाला असल्याचाहि संभव आहे. मूळ गिलगमेश काव्याचा गाभा नि. पू. ४००० इतका प्राचीन आहे. पण त्यावर संस्करण होऊन त्याचे काही काळाने हल्ली उपलब्ध असलेलें स्वरूप बनले आहे. असाच प्रकार आमच्याहि वाड्मयांत झाला आहे. मूळचे प्राचीन सूत वाड्मय काव्यवद्ध स्वरूपांत नंतर संस्कारिले गेले आहे. येणेप्रमाणे या दोन्ही देशांतील लोक एकच मानववंशाचे असून त्यांचे मूळ एकच होते. या आमच्या विधानाला या काव्यानेहि उत्कृष्ट रीतीने पुष्टि मिळते. असो. या पुढील लेखांत सुमेरी व आर्य वाङ्मयांतील इतर साम्यदर्शन करण्याचे योजिले आहे.