पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६७) या देखाव्याकडे मला पहावेना ! माणसांची माती झालेली होती! शेतांत पाणी सांचून त्यांची डबकी बनली होती. नावेचे दार मी उघडतांच प्रकाशाचे किरण माझ्या गालावर पडले. त्याबरोबर मी मटकन् खाली बसलो. माझ्या डोळ्यांत अश्र येऊन ते माझ्या गालावर पडू लागले. भोंवती सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पाण्याच्या महासागराशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते! (टीप:-हा देखावा व हे वर्णन प्रस्तुत लेखकाच्या लेखणीतून स्वानुभवा- वरून उतरल्याइतके त्याला स्पष्ट दिसत आहे.) पीर-नापिरितम् म्हणतो, त्या अवधीत, The mountain of the land of Nitsir held the ship fast And did not let it slip. Then I brought all out into the four winds, I offered an offering, I made a libation on the pealt of the mountain, The Gods smelt the sweet savour. Then the lady of the Gods drew nigh. माझी नाव पर्वताच्या शिखरावर घट्ट बांधलेली होती. त्यामुळे तेथून ती निस टली नाही. मग माझ्याबरोबर नावेत घेतलेल्या सर्व प्राण्यांना मी बाहेर आणले एक यज्ञ करून त्यांत सव देवांना हविभाग दिले. मग त्यांतूनच देवांनी निर्माण केलेली एक स्त्री बाहेर आली. त्यानंतर वेल हा देव तेथे आला व त्याने- Ho took my hand and bronght me forth, He brought my lady fortha Hetmned towards us, be stood between us. He blesses us, saying Hitherto hath lir-Napishtim been of mankind. But now let Pir-Vapishtim be like unto the Gods. माझा हात धरून मला बाहेर आणले. तसेच त्याने त्या देवकन्येला-माझ्या- पत्नीलाहि-बाहेर आणले. नंतर त्याने आम्हा दोघांना आपल्या दोन्ही बाजूंना घेऊन आशीर्वाद दिला की, ' आजपर्यंत, हे पीर-नापिरितम् , तूं मानव होतासः पण येथून पुढे तुझी गणना देवकोटीत केली जाईल.' याप्रमाणे आद्य जलप्रलयाची ही सुमेरी कथा आहे. साधारणतः आद्य जलप्रल- याची एक कथा सांप्रतच्या युरोपियन लोकांच्या दंतकथतहि आढळतें. तीहि या सुमेरी कथेपासनच परंपरेने आली आहे. सुमेरिआपासून बविलोनिया, मग असीरिआ मग पर्शिआ. मग ग्रीस, व प्रसिपासून अलीकडील राष्ट्र-असा या परंपरेचा क्रम आहे. अर्थात या क्रमाने येतां येतां तिच्यांत कित्येक फरक होत गेले. वायबलमधील जेनिसिस प्रकरणांतील अध्याय ६-९ यांत ती दिला आहे. परंतु हिंदी वाडायांतील