पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६९) नावनुपकलप्य उपासांचके । स औधे उत्थिते नाबमापेदे । तं समत्स्यऽउपन्यापुरते तस्य हो नाव: पाशं प्रतिनुमोच । तेनैतमुत्तर गिरिमतिदुद्राव। ( नंतर मनूने त्या माशाचे तशाप्रकारे संवर्धन केल्यावर त्याला समुद्रांत नेऊन सोडले. नंतर जितक्या वर्षांनी महापूर येईल म्हणून त्या माशाने सांगितले होते. तितक्याच वर्षांनी त्या माशाच्या सांगण्याप्रमाणे ममूनें एक नाव तयार केली. मग पूर येतांच तो तीत शिरला. तेव्हां तो मत्स्य पाहृत पोहत मनूजवळ आला व आपल्या शृंगाला (डोक्याला) त्याने ती नांव दोरीने बांधून टाकली व अशा उपा- याने त्याने ती ओढीत उत्तरगिरीच्या टोकावर नेऊन स्थिर केली.) इस होवाच । अपीपरं वै त्वा वृक्षे नावं प्रतिबध्नीप्य । तं तु त्वा मा गिरी सन्तमदकंयन्तश्चेत्सीद् यावद्यावदुदकं समवायात्तावत्तावदन्यवसासीति । तदप्ये तद्- तरस्य गिरे मनोरवसर्पणामिति । औधो हि ताः सर्वाः प्रजा निस्वाह । अथ इह मनुरे- वैकः परिशिशिषे । (नंतर तो मत्स्य म्हणाला:- मी तुझे रक्षण केले आहे. आतां तुझी नाव वृक्षाला बांधून ठेव, पण पाण्यामुळे पर्वताशी तुझा संबंध तोडला जाऊ देऊ नकोस नंतर जसजसा पूर ओसरू लागेल, तसतसा तूं पर्वतावरून खाली ये.' त्याप्रमाणे पर्ट पर ओसरू लागतांच मनु खाली उतरु लागला, व म्हणून त्या उत्तरागिरीवरील त्या उताराला मनूचा उतार' असे नांव तेव्हापासून पडले आहे. परंतु तत्पूर्वी त्या महापुराने सर्व जग वाहून गेले, व मनु त्या गिरिशिखरावर एकटाच राहिला.) सोऽर्चन छाम्यवचार प्रजाकामः । तत्रापि पाक्यज्ञेनेजे । स घृतं दधिमस्त्वा मिक्षामित्याप्सु जुयां-चकार ततः संवत्सरे योषित्सवभूव । सा ह पिब्दमानेनेवोदयाय । ......तया मित्रावरुणो संजग्माते । (नंतर त्याने तेथें पूजा ब तप केले. तसेच पाक्यज्ञ केला, व धृत दधि, तक यांच्या त्या जलांत आहुती दिल्या. त्यापासून एक संवत्सरान एक सुंदर स्त्री निर्माण झाली, व तिचे शरीर घट्ट होतांच ती त्याच्यापुढे . आली. तिला भेटण्यास मित्र व वरुण आले.) ९ तां ह मनुरुवाच कासीऽति । तव दुहितति । कथं भगवति मम दुहितेति । याऽमूरप्सु आहुतीरहौषीः घृतं दधिमत्स्त्वामिक्षां ततो मामजीजनथाः । साऽशीरस्मि । तां मा यज्ञेऽवकल्पय । यज्ञे चेद्वै माऽवकल्पयिष्यसि बहुः प्रजया पशुभिर्भविष्यसि । यामु मया कांच आशिषमाशासिष्यसे सा ते सो समाद्धप्यतऽइति। मलगी आहे. मनु (मनु तिला म्हणाला:-'तूं कोण आहेस ? ' तेव्हां तिनं उत्तर दिले, 'मी तुझी मुलगी आहे.' मनु म्हणाला, 'हे भगवति, तूं माझी मुलगी कशी?' तिनं उत्तर दिले:-तुं जलांत ज्या घृताच्या, दह्याच्या, तकाच्या वगरे आहती दिल्यास. त्यांच्यापासून माझी उत्पत्ति झाली असल्याने मी तुझी मुलगी आहे. मी प्रत्या आशी (र्वाद ) स्वरूप आहे. माझी यज्ञप्रसंगा योजना कर, म्हणजे तुला संपत्ति व ताच्या, दह्याच्या, मुलगी आहे. मी.