पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अत्यंत महरा पतला लावनमन है संस्बन (७७) या इंग्रजी उताऱ्यातील दरेक गुणवाचक शब्दाला वेदांतील सूर्यविषयक सूक्त काढून दाखवितां येतात. उदाहरणार्थः- सूर्य हा सर्व स्थिरचराचा आत्मा आहे (ऋ. १-११५-१), तो नियमाने चालतो (क्र. ४-५४-४), सर्व देव व प्राणी त्याने घालून दिलेल्या नियमाने चालतात (म. ५-८१-३), त्याला आकाशाच्या, पृथ्वीच्या आणि जलाच्याहि पलीकडील दिसते (अ. वे. १३-१-४५), तो सर्व जगाची टेहळणी करणारा आहे व त्याला मत्यांची चांगली व वाईट सर्व कृत्ये दिसतात. (ऋ. १-५०-७), सूर्य मनुष्याला प्रेरणा देतो (ऋ. ७-६३-४ ). इत्यादि समानार्थक उतारे अगदी भाषांतरासारखे आहेत. सर्वात अत्यंत महत्त्वाचा नवीन शोध हा आहे की, सुमेरी भाषेतहि शम्सू सूर्यदेवतेचे एक नांव मित्र हे आहे. मर्डकचा शत्रु जो तैमात, त्याचे नांव अगदी शब्दशः अथर्ववेदांत अनुस्यूत झाल्याने हिंदी व सुमेरी कथांच्या संबं- धाचा धागा उकलण्यास कै. लो. टिळकांना जी अत्यंत महत्त्वाची मदत झाली आहे. तितकीच महत्त्वाची मदत मित्र हे संस्कृत सूर्यवाचक नांव सुमेरी बाङ्मयांत शब्दशः त्याच देवतेला लावून त्या दोनहि संस्कृतींनी शब्दांचा व विचारांचा विनिमय केल्याच्या शोधाने होणार आहे.या संबंधाने मॅकेंझीने म्हटले आहे:-"One attha names of Shamsh was MITRa, like the god who was linked with Varuna in the Indian Rig-Veda." ( शम्स् या सूर्यदेवतेचे एक नांव मित्र असेंहि आहे; हेच नांव हिंदी ऋग्वेदांतील 'मित्रावरुणो' या शब्दयुग्मांत दर्शविल्याप्रमाणे वरुणाशी नित्य संबद्ध असलेल्या सूर्यदेवतेचेंहि आहे ) सन १९०७ साली वोगाझूकोई या गांवी ह्यूगो विक्कर या जर्मन संशोधकाला सांपडलेल्या एका लेखांत स्त्रि. पू. १८०० वर्षांपूर्वी आशियामायनरमधील मिटानी या प्रांतावर राज्य करणाऱ्या हिटाइट लोकांच्या देवांच्या नांवांत मित्र, वरुण, इंद्र. नासत्य हीं नांवें सांपडली, त्यावरून मित्र या नांवाचा एक देव हिटाईट लोकांत होता, इतका शोध लागलाच होता; परंतु त्याच्याहि पूर्वीच्या काळी प्रत्यक्ष सुमेरी वाझयांत सूर्यालाच लावलेल्या मित्र या शब्दाने सुमेरी व हिंदी संस्कृतीचे एकत्व अभेद्य पायावर अधिष्टित केले आहे. किंग हा ग्रंथकार म्हणतो:- The senetic Babylonians learnt from the Sumerians the art of writing. They took their Gods from them or adopted them; they also took their ideas of the creation of the world. We know that, at the time of Hammurabji, the sonotic seribes copied out and studied Sumerian religious texts. (सेमेटिक मानव-वंशाच्या बाबलोनिअन लोकांनी सुमेरिअन लोकांपासनच लेखनकला उचलली. व त्यांचे देवहि आत्मसात् केले. हम्मुरब्बीच्या काळी (स्त्रि. पू. ३००० प्राचीन समेरिअन लोकांच्या धर्मग्रंथांच्या नकला लेखकांकरवी सेमेटिक लोकांनी उतरून घेऊन त्यांचे अध्ययन केल्याची माहिती मिळत आहे.)