पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तोंडी घातलेल्या उद्गारांची आठवण झाल्यावांचून रहात नाही.) मृत्यूनंतरच्या स्थितीला तो असेंच म्हणतोः- Somothing after death, The imdiscovered country from whose bourme No traveller returneth. To the house wherein he who enters, is excluded from light, they behold not the light, they dwell in darkness. आनंदा नाम ते लोका अंधेन तमसाऽवृताः। तांस्ते प्रेत्याभिगच्छंति ये के चात्मनो जनाः॥ (जे लोक आत्महत्या करतात, ते मेल्यावर दुःखपूर्ण व घोर अंधकाराने व्याप्त अशा लोकांत जातात.) To thoplace where dust is their bread, and mud their food. (तेथे त्यांची भाकरी म्हणजे माती, व त्यांचे अन्न म्हणजे चिखल होच) आपल्याइकडेहि असेंच वर्णन आहे:- पापी मनुष्याला नरकांत वाहत्या रक्ताच्या प्रवाहात टाकतात, तेथे त्याला आपलेच केश उपटून खावे लागतात. (अथवेवेद, ५-१९-१३) तेथे अगदी अंध तम असतो (अ. वे. ५-१८-३). तेथें राक्षस व धानी नांवाच्या पिशाच्चिी असतात इत्यादि वर्णन आहे. यानंतर आपण सुमोरिअन लोकांच्या शासनविषयक नीतिविषयक कल्पना काय होत्या, याचा थोडासा विचार करूं. या संबंधींच्या विवेचनाचा निष्कर्ष साधारणत. खाली दिल्याप्रमाणे निघतो. सुमेरिअन संस्कृतीच्या आद्य काळी तेथील लोकांची अनीतीची कल्पना म्हणजे तत्कालीन धर्मसमजुतींचे उल्लंघन ही होती. विधिनिषेधात्मक ज्या धार्मिक समजती त्या काळी रूढ होत्या, त्या मोडण्यानें पाप लागते, व तचि अनीति अशी मी कल्पना होती. उदाहरणार्थ खाद्यपेयांचे निबंध मोडणे, शकुनांच्या दृष्टीने वाईट गोत्र करणे अशा प्रकारची कृत्ये अनीतींची मानीत. परंतु पुढे पुढे धार्मिक निबंध मोडण्यामुळे लागणारे पाप, व सामाजिकदृष्ट्या वाईट कृत्य करण्यापासून होणारी अनीति, यांत फरक करण्यांत येऊ लागला. पाप व अनीति या उभयप्रकारच्या दुर्वर्त- नांपासून संकटे येतात. ही समजूत कायम राहिली. तरीपण धार्मिक व सामाजिक या दोन दृष्टी उत्तरोत्तर अधिकाधिक भिन्न होत चालल्या. त्यामुळे धार्मिक पाप न करितां केवळ सामाजिक गुन्हा केला, तरीपण त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात अशी कल्पना पढे रूढ झाली. ही सामाजिक नीतिविषयक कल्पना त्यांच्यांतील शासनपद्धतीच्या मूलस्थानी मानिली गेली. त्यामुळे राजानेंहि न्याय अन्याय बरोबर पाळले पाहिजेत, असे ओघानेच प्राप्त झाले. ही राजाची कर्तव्ये एका विटेवर कोर-