पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करण्याचे त्याने नाकारले आहे काय ? तुरुंगांत असलेल्याला त्याने अंधारकोठडौंत कोंडून ठेवले आहे काय ? पकडलेल्या कैद्याला याने साखळदंडाने बांधले आहे काय ? व साखळदंडाने बांधलेल्याचे पाश अधिक घट्ट त्याने केले आहेत काय? त्याने देवाचा अपमान केला आहे. काय? अथवा देवाविषयी तोंडाने अपशब्द अथवा असभ्य उच्चार काढले आहेत काय? आपल्याहून वडील माणसांचा यानें अपमान केला आहे काय? अथवा आपल्या वडीलभावाला दुखविले आहे काय? आपल्या मातापित्या- विषयी तिरस्कार दाखविला आहे काय? बारीकसारीक गोष्टीत औदार्याचे ढोंग करून महत्त्वाच्या गोष्टींत त्याने लोपिणा अगर कद्रूपणा केला आहे काय ? त्याने हो। बद्दल 'नाही' व 'नाही' बद्दल 'हो' म्हटले आहे काय ? ( असत्य भाषण केले आहे काय ? ). तोंडाने अश्लील, दुष्ट व पापी शब्द त्याने उच्चारिले आहेत काय ? खोटी मापें वापरणे, खोटा हिशोब तयार करणे अथवा खोटें लिखाण करणे, यांपैकी कांही त्याने केले आहे काय ? खऱ्या वारसांची मिळकत त्याने लुबाडली आहे काय व अनीतिसंबंधापासून पैदा झालेल्या प्रजेला त्याने ती दिली आहे काय ? त्याने शेताच्या हट्टींचे बाण अथवा खुणा खोट्या केल्या आहेत काय व खऱ्या असलेल्या नष्ट केल्या आहेत काय ? दुसऱ्याचे घर फोडून त्याने गैरकायदेशीर गृहप्रवेश केला आहे काय? त्याने दुसऱ्याच्या बायकोशी संबंध ठेविला आहे काय? दुसऱ्याचे रक्त त्याने सांडले आहे काय ? दुसऱ्यावर हल्ला करून त्याला व्यथा, महाव्यथा अथवा जखम केली आहे काय ? दुसऱ्याच्या वस्तू त्याने चोरल्या आहेत काय? __अशी ही प्रश्नमालिका आहे. मेकॉलेने तयार केलेल्या इंडियन पीनल कोडांतील बहतेक गुन्हे यांत येऊन गेले आहेत. राजाविरुद्धचे गुन्हे ( offences against the state ), शरीरविषयक गुन्हे ( offences against the person ), मिळकतविषयक गुन्हे ( offences against property), धर्मभावनाविषयक गन्हे ( offences against religion) वगैरे सर्व बाबवार गुन्ह्यांचा संग्रह या पांच सहा हजार वर्षांपूर्वीच्या फौजदारी निबंधांत सशास्त्र केलेला पाहुन अलीकडल्या पुष्कळशा सरकारी कायदेपांडतांचा ( Law members) चा गर्वपरिहार यावा इतका तो संपूर्ण आहे. त्यावरून त्या काळच्या समाजाच्या संस्कृतीची उत्कृष्ट कल्पना येते. व इतक्या प्राचीन काळी त्या समाजाने स्वतःला प्राप्त करून घेतलेल्या श्रेष्ठ नीतिमतेबद्दलच्या कौतुकानें मन विस्मित होऊन जातें ! याप्रमाणे सुमेरी व हिंदी संस्कृतीचे तुलनात्मक विवेचन आतापर्यंतच्या चार लेखांकांत आम्ही केले आहे. यावरून हिंदी व सुमेरी या उभय संस्कृतीत इतकें विल- क्षण साम्य आहे की, या दोघांची मूळ एकच संस्कृति असली पाहिजे, याबद्दल आमच्या मते शंका येण्यास यत्किचिहि जागा राहूं नये. सुमेरी संस्कृतिविषयक वाजायप्रकाशन करणाऱ्या पंडितांना सुमेरी व युरोपीय दंतकथांत जें थोडेसें जुजबी साम्य दिसले तेवढ्यावरूनहि युरोपिअन मानववंशाचें