पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८७) उत्तरध्रुवप्रदेश होय, असे आम्ही आतापर्यंतच्या विविध प्रमाणांनी निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात् त्यावरून त्या स्थानी रहात असलेल्या मानववंशासंबंधाचा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो, व तसा तो प्रो. फ्रेझर नावाच्या पंडिताने उपस्थित केलाहि आहे. तो म्हणतो:- How far such hemogemeity of civilization nay be taken as evidence of homogeneity of race is a question for the ethnologist. 'वर वर्णन केलेल्या संस्कृतींच्या एकत्वावरून त्या समाजांच्या एकरूपतेबद्दलचा सिद्धान्त निघतो की काय, या प्रश्नाचा निर्णय करण्याचे काम मानव-वंश-शास्त्र- ज्ञांचे आहे.' ... तेव्हां हा प्रश्न सोडविण्यासाठी या पुढीलच्या व शेवटच्या लेखांकांत घटकाभर आपण मानव-वंश-शास्रज्ञ बसून आतापर्यंत आपल्या सिद्धांताला त्या शास्त्राची कितपत पुष्टि मिळते, ते अवलोकन करूं.