पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९०) भागाला या मिळालेल्या विजयाप्रीत्यर्थ एका बैलाचा यज्ञ करीत असल्याचा देखावा दाखविला आहे. यानंतर असाच एक अश्मफलक या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला राजा' नराम्-सिन् याचा फलक' ('Stele of Naravn-sin') असें म्हण- तात. तोहि फलक एका महत्त्वाच्या विजयाच्या स्मरणाप्रीत्यर्थ कोरलेला असल्यान तो' विजयफलक ' याहि नावाने प्रसिद्ध आहे. साधारण पिवळटसर दगडावर हे चित्रं कोरलेले आहे. त्यांत 'नराम्-सिन् ' हा राजा एका पर्वतावर चढलेला आहे. तेथे त्याचे पराभूत झालेले शत्रू गुडघे टेकून त्याची क्षमायाचना करीत आहेत, व वर आकाशांत इइतर देवीचा अष्टकोनी तारा उज्ज्वल तेजानें प्रकाशत आहे, अशा प्रका- रचे चित्र त्या दगडावर कोरलेले आहे. याशिवाय चुन्याच्या दगडाच्या एका फलकावरचें एक चित्र सांपडले आहे. त्यांत त्या काळचा एक प्रसिद्ध मूर्तिकार अथवा तक्षकार ( Sculptor ) ' गुडिआ' याला त्याचा कुलदेव हा दुसऱ्या एका मोठ्या देवापुढे नजर करण्यासाठी नेत असल्याचा देखावा दाखविला आहे. त्यांत 'गुडिआ' ने आपल्या इकडील मुलींच्या पट्ट्याच्या झालरीच्या झग्याप्रमाणे आंगरखा घातलेला आहे; त्याच्यापुढे बसलेल्या त्या मोठ्या देवाला मोठाल्या दाढीमिशा आहेत, त्याने मुकुट धारण केलेला आहे, व त्याच्या दोन खांद्यांवरून दोन नाग आपल्या फणा काढून उभे राहिले आहेत, असे चित्र कोरलेले आहे. स्वतंत्र समूहांत दाखविलेल्या मनुष्याकृतींचे अवयव जरी स्पष्ट असले तरी, ते स्वतंत्र पुतळ्या इतके सूक्ष्म नसतात, व शिवाय त्यांचा फक्त दर्शनी भागच अशा चित्रांत व्यक्त होत असल्याने, पुतळ्याप्रमाणे सर्व बाजूंनी त्या आकृती परीक्षितां येत नाहीत, असे सर्वांगपरीक्षण फक्त पुतळ्यांचेच उत्कृष्ट रीतीने होऊ शकते. सुदैवाने त्या काळचे असे पुतळेहि बरेच उपलब्ध झालेले आहेत, व ते लगश, सुसा, ऊर वगैरे ठिकाणच्या उत्खननांत सांपडले आहेत. त्यापैकी काहींच्या बद्दलचे वर्णन व चित्र- दर्शन फारच मनोरंजक वाटेल, अशी खात्री वाटते. आजच्यापूर्वी अजमालें सहा सात हजार वर्षांमागील माणसांचे तत्कालीन कारागिरांनी बनविलेले पुतळे प्रत्यक्ष पाहून कोणाचें मन आश्चर्याने स्तिमित होणार नाही? “ सर्व यस्य वशादगात् स्मृतिपथं " अशा सर्वभक्षक कालाच्या तडाक्यांतून वाचलेले हे अवशेष, आपल्याला कल्पनेलाहि अगम्य अशा भूतकालांत प्रत्यक्ष नेऊन सोडतात ! यांतील एका पुतळ्याचा फोटो या खाली देत आहों. या चित्रात वरच्या भागाला एका सुमेरिअन् पुरुषाची पार्श्वकृति ( Profile ) दाखविलेली असून, त्याखाली त्याचा सन्मुख भाग दाखविलेला आहे. हा पुतळा