पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या दृष्टीने वेदातील इंद्राचे वर्णन वाचलें म्हणजे तत्कालीन आर्यलोकांच्या स्वरूपवर्णनाची आपल्याला चांगली कल्पना येईल; म्हणून ते वर्णन आतां आपण पाहू. इंद्राविषयी ते म्हणतातः-" त्याचा वर्ण सोन्याप्रमाणे पीतगौर आहे, व त्याचे रूप अत्यंत सुंदर आहे. ( हरित्वता वर्चसा सूर्यस्य श्रेष्ठैः रूपैस्तन्वं स्पर्शयस्त्र । ऋ. १०-११२-३ ), तो सुशिप्र आहे, म्हणजे सुंदर नाकाचा आहे (सुशिप्र- शोभननासिकः-सायनाचार्य), त्याचे केस सोनेरी रंगाचे आहेत ( हरिकेशः) त्याची दाढीहि सोनेरी आहे ( हरिश्मश्रः), त्याचे गाल व ओठ सुंदर आहेत;" असें इंद्राचे वर्णन आहे. तत्कालीन सुंदर स्त्रियांचेंहि वर्णन वेदांत सांपडते, व तें इंद्रा- णीच्या रूपाने आढळते. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलाच्या ८६ व्या सूक्तांत असे वर्ण सांपडतेः- कहा कि सुवाहो स्वंगुरे पृथुष्टो पृथुजाघने । 'सुंदर हस्ताची, लांब व विपुल वेणीची, विस्तृत कटिपश्चाद्भागाची,' असे तिचे वर्णन आहे. 'विस्तीर्ण भालप्रदेशाची व सरळ नासिकेची' म्हणूनहि तिची स्तुति केली आहे." येणेप्रमाणे वेदांत तत्कालीन आर्यत्रीपुरुषांचे जे स्वरूपवर्णन दिलेले आहे, त्याच्याच मदतीला सिंध व पंजाबमधील उत्खननांत सांपडलेल्या अवशेषासंबंधी सर जॉन मार्शलसाहेबांनी दिलेले वर्णन घेऊ. 'टाइम्स ऑफ इंडिआ' वर्तमानपत्राच्या सचित्र साप्ताहिकाच्या थोड्या दिवसांपूर्वीच्या अंकांत त्यासंबंधांचे वर्णन त्यांनी दिले आहे. तो उतारा जरा लांब असला तरी महत्त्वाचा असल्यामुळे आम्हीं तो येथे शब्दशः देत आहों.ते म्हणतात- Pr" As might have been expected, nearly all the skeletal remains found at Alohenjo-Daro, appertain to adolio-cephatic people, who may reasonably be assumed to have belonged to the great long- headed race of Southern Asia and Europe. ... That there were features in common between the religious cults of the Indian and Mesopotemian people may be inferred from several figures closely resembling each other. The numerous terra-cotta figurines, more-over, which portray anude female crowned with elaborate head-dress and bedecked with oma- ments can hardly fail to be identified with the figures of the other- Goddess fainilier in Mesopotemia and countries farther to the wost." (आपल्या अपेक्षेप्रमाणेच माहेंजोदारो येथील उत्खननांत जे माणसांचे सांगाडे सापडले आहेत, त्यावरून पहातां, ते सर्व लोक लंबशीर्ष नमुन्याचे होते असे सिद्ध होते. दक्षिण आशिया व युरोप यामध्ये वास करणारा जो लंबशीर्ष मानववंश आहे, त्याच वंशांतील हे लोक होते. त्याचप्रमाणे येथें देवतांच्या लहान लहान मूर्ती पुष्कळच सांपडल्या आहेत, त्यांवरून मेसापोटोमया व माहेंजो-दारो येथील संस्कृ- तींचा परस्परसंबंध दृढतर होतो. या मूर्तीतील बहुतेक नग्न असून, त्यांच्या मस्तकावर