पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राघो भरारीचो कंदाहारक डे दृष्टि २१७ ३१ : : : राघो भरारीची कंदाहारकडे दृष्टि इतिहास संग्रह वर्ष ७ वें अंक १०-१२ } ऐ. स्फु. ले. भा. ४ ले. ११ ४ मे १७५८ { [मराठ्यांच्या चढत्या वाढत्या पराक्रमाचे स्वरूप दाखविणारें खुद राघोबाचे पत्र. ] श्री. " सेवेशीं विज्ञापना. लाहोरमुलतान, काश्मीर वगैरे सुभे अटके अलिकडे, येथील बंदोबस्त करून अम्मल बसवावा. त्यास, कांहीं जाला, व कांहीं होणे तोही लवकरच करितोंअहमदखान अबदाली याचा पुत्र तैमुर सुलतान व जाहांखान यांचा पाठलाग सरकारचे फौजेने करून त्याची फौज लुटून घेतली. कांही थोडीशी फौज झडत पडत अटकेपार पिशाबरास जाहान खान व तेमुर सुलतान पोहोंचले. खांसा अबदालो इस्पहां इराणचा पाद शहावरी फौज सुद्धां चालोन गेला होता, त्यास इराणचा पादशहा जबरशाहा तिकडून अबदालीचे फौजेवर चालुन येऊन हल्ला करून कांहीं फौज लुटून घेतली. खासा अबदाली मात्र बारा, चौदा हजार फौजेनिशीं इस्पहानांतून अलिकडे कंधारास आला. इराण्याची फौज याचा पाठलाग करीत आली आहे. जबरदस्तखान व मुकरबखान वगैरे सरदार व जमीनदार त्या प्रांतीचे अब दालीचे जबरदस्तीमुळे रुजू होते, तेही बदलन' हंगाम करितात. हल्लीं त्यांच्या अर्जा, रफीक होऊन सेवा करून दाखवून अबदालीस तंबी कछु ऐशा आल्या आहेत. चहूकडून अबदालीवर हंगाम जहाला आहे. याजमुळे त्यांचा धर सुटला आहेसबब हिरातेंत गेला तर अबदालीस धर धरवत नाही. सारांश, अबदालीचा जोरा तिकडून होतो ऐसे नाहीत्याचे साहित्य उपराळा कोण्ही करितां दिसत नाही. इरानचे पातशाहान तिकडून फारच जेरदस्त केले आहेइकडून जोरा पोहोचावून अंमल अटकेपार करावा सरकारचा . अहंमदखान अबदाली याचा पुतण्या अबदुल रहीमखान अबदालीचे दौलतेचा वारीस स्वामीपाशी देशास आला, तो स्वामीनीं आम्हांकडे पाठविला होता. १ बदलून अबदाली विरुद्ध जाऊन. २ दंगा. ३ विनंतीपत्रे, स्नेही, दोस्त ४ साहच. ५ बारस. [ ६१