पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास पाय पसरून बोलत होते. आंतः तमाम बंदोबस्त सुमेरसिंग व महमद इसफ व खरगसिंग चौकीदार यांचा. परवानगी रसानगी' त्याची. मराठे माणूस आंत अगदी नव्हते. शहर लुटितात अशी धास्त वसून कोणास कोणी न पुसे. अशी अवस्था होतो. गाडद्यांस हा मनसवा सांगितला ते समयींचा करारकिल्ल्यांपैकी पुरंधर व नगर व साष्टी हे तीन किल्ले व पांच लाख रुपये रोख द्यावे. येणेप्रमाणे करार असतां आडमुद्दे राज्याचे वगैरे गाडद्यांनीं मनस्वी घातले. “ नाहीं तरी त्यांची गत ती यांची ! अल्लीबहादर राज्यास खावद करू.' असे चित्तास येईल तसे बोलत. गांवांत जितका मुसलमान होता तितक्यांनी बंदुका घेऊन वाड्यांत जथ पाडिला. | अभ्यास :--१. नारायणरावाच्या खुनानंतर पुण्यातील परिस्थिति किती बिकट होती याचे वर्णन करा. २. नारायणरावाच्या खुनाबरोबर आणखी कोणत्या प्रकारचे खून करण्यांत आले ? मराठे-इंग्रज सेनापतींची भेट २९ मे १७९६ ['नॅरेटिव्ह ऑफ दि कॅम्पेन इन इंडिया, वुइच टरमिनेटेड् दि वॉर वुइथ टिपू सुलतान इन सेव्हंटीन नाइंटी टू' या नांवाच ८' x १०॥' आकाराच्या २९६ पृष्ठांचे पुस्तक मेजर डायरम (Dirom) याने युद्धोत्तर हिंदुस्थानांतून विलायतेस जात असता जहाजावर लिहिले. हे वृत्तांताचे पुस्तक इ. स. १७९३ मध्ये युद्ध संपल्यावर एक वर्षाच्या आंत लंडन येथील डब्ल्यू. वुल्मर अङ कंपनीने प्रकाशित केलेले आहे. । प्रस्तुत पुस्तकांत या युद्धांतील इंग्रज, मराठे, निजाम यांच्या सैनिकांची संख्या, त्यांतील किती जाया झाले, मोहिमा किती झाल्या टिपूची तयारी, सैन्यांच्या तळाचे नकाशे इत्यादि विस्तृत माहिती असून टिपूला शरण येणें कां भाग पडले याचेहि विवेचन आहेतत्कालीन इंग्रज ज्ञानाच्या प्रसारासाठीं मुद्रणकलेचा कसा सुरास १ चिठीने दिलेली परवानगी. २ तळ दिला. ७० ]