पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास उपयोग करू लागले होते हे पाहून आश्चर्य वाटते. आमच्याकडे या काळांत स्वराज्य असूनहि मुद्रणकलेचा प्रारंभहि नव्ह्ता ! | या ग्रंथांतील भाग १, प्रकरण १ पृष्ठे १७ ते १३ यावरून 'पुढील उतारे अनुवादित केले आहेत.] [कथा संदर्भ : श्रीरंगपट्टण जवळील (Milgottah मेलकोटा? ) च्या आसपास इंग्रजी सैन्याचा तळ होता, तेथूनच कांही अंतरावर मराठ्यांची छावणी होती तरी दोन्ही तळांमध्ये बरेच अंतर होते. या भागांत तबू ठोकण्यांत आले होते. येथे इंग्रज गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलीस व मराठे पुढारो हुरीपंत फडके व परशुरामभाऊ पटवर्धन यांची भेट झालो. (२९ में, इ. स. १७९१) त्या वेळची पुढील वर्णने आहेत. ] | लॉर्ड कॉर्नवालीसने आपल्या बरोबर जनरल मेडोस, त्याचे सहकारी व सैन्यांतील प्रमुख अधिकारी घेतले व ठरल्या ठिकाणीं व ठरल्या वेळी दुपारी एक वाजतां तो आला. लॉर्ड कॉर्नवॉलीस वाट पहात आहे असे अनेक वेळा सांगूनहि मराठ्यांचे प्रमुख तीन वाजेपर्यंत स्वतःच्या कॅम्पमधून हाललेह नाहींत ! कारण त्यांची समजूतच ही की नियमितपणा हा सत्ता व दजो याशी विसंगत होय. शेवटीं ते हत्तीवर स्वार होऊन... मोठ्या लवाजम्याने चार वाजतां ठरलेल्या ठिकाणी येऊन पोहोचले. हत्तीवरून खाली उतरल्यावर तंबूच्या दाराशीं लॉर्ड कॉर्नवॉलीस व जनरल मेडोज यांनी त्यांचे स्वागत केले व थोडा वेळ औपचारिक बोलणे झाल्यावर एकांतीं बोलण्यासाठी दुस-या तंबूत गेले. सरदार, मराठे सैनिक आणि सर्व मराठे लोक यांचा पोशाख्न अगदी साधा पण नीटनेटका होता. (हे लोक) दिसण्यांत सौम्य, स्वभावाने दयाळ बोलण्यांत सभ्य आणि अकृत्रिम आहेत. त्यांच्यामध्ये दोन वैशिष्ट्ये आहेत आपल्या मुख्याधिका-यांच्या आज्ञा पाळणे व देशावर प्रेम करणे. मुसलमान, निजाम किंवा 'मोगल' सैन्य असे संबोधिल्या जाणान्या सैन्यांत ज्याप्रमाणे, पूर्वेकडील देशांतून आलेले व स्वतःच्या धाडशीपणाबद्दल गर्व असलेले कांहीं चिलखत घातलेले शिपाई असतात तसे यांत (मराठी सेनेत ) मुळीच नव्हते. असले लोक गवष्ठ व व्यक्तिगत शौर्याबद्दल प्रसिद्ध असत, ७२ ]