पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठ्यांना इंग्रज शरण आले २३१ माघार घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्याचे एक कारण असे कीं रोज रोज होणाच्या नुकसानीने त्यांचे सैन्य कमी होत होते आणि दुसरें हें कीं राघोबाने त्यांना सोडून जाण्याची सिद्धता केली होती. माघार घेतांना पुण्यापासून पांच मैलांवरील वडगांवाला* इंग्रज कोंडले गेले, ते घाटापर्यंत पोहोचू शकले नाहींत. सैन्यांत जे थोडे सैनिक उरले होते ते सर्व थकलेले व निराश झालेले होते. ते युद्ध चालू ठेवण्यास राजी नव्हते. यामुळे इंग्रजांना मराठ्यांबरोबर नुकसानीचा करार (converition) करावा लागला. पुढील अटी मान्य केल्यावर इंग्रज सैन्याला मुंबईस जाण्यास मराठ्यांनी परवानगी दिली : । महादजी शिंद्याच्या ताब्यांत राघोबास देणार, त्या वेळीं माळवा प्रांतांत असलेलें गॉडर्डचे सैन्य यमुनापार पुनः परत जाईल, या व मागील युद्धांत इंग्रजांनी जो प्रदेश जिंकला तो मराठ्यांना मिळेल आणि भविष्यकाळांतहि मराठ्यांच्या घरच्या भांडणांत इंग्रज भाग घेणार नाहींत. या रीतीने मराठ्यांचे दुसरे युद्ध मुंबईकरांच्या नुकसानीने संपले. मराठ्यांकडून प्रदेश जिंकण्याची आपली आशा पुनः एकदां विफल झाल्याचा अनुभव मुंबईच्या गव्हर्नरला आला. | मुंबईच्या सेनाधिका-यांनी स्वतःच्या जबाबदारीवर केलेला हा नुकसानीचा करार मुंबई किंवा बंगालनेंहि पाळला नाहीं. पुरंदरच्या शेवटच्या तहाच्या वेळीं बडगांवचा करार बदलण्याचा इंग्रजांनी यत्न केला (पण) तो पुण्याने हाणून पाडला. वडगांवचा करार बदलण्यास मराठे तयार नव्हते; त्यांच्याशी तिस-यांदा तह करण्याचीहि मराठ्यांची इच्छा नव्हती कारण इंग्रजांनी दोनदां तह मोडले होते. अशा रीतीने इ. स. १७८१ मध्ये युद्ध पुनः सुरू झाले. या वाटाघाटीमध्ये मुख्य अडचण म्हणजे मराठे साष्टी सोडण्यास तयार नव्हते व इंग्रजांनी पुनः एकदां राघोबास आपल्या छत्राखाली घेतले होते. | अभ्यास :--स्प्रिगेलच्या मते वडगांवला मराठ्यांनी इंग्रजांचा पराभव कसा केला ते सांगा.

  • पुणे ते वडगांव अंतर २१ मैल.

[७५