पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास व मध्यम कस्तुरीची ऐशा दोन कराव्या. गंधअक्षत खांसा मध्यम असामी पाहून लावीत जावी. उभे खोडानें गंध उगाळावे. गंध लावणारे चांगले कुशल चौकस माणूस असावे. त्याणीं सांखळीने कपाळी लावावे. वांकडे गंध लागू नये व अक्षत लावते समयीं नाकास धक्का न लागतां कपाळाचा मध्य पाहून लहान मोठी अक्षत ओघळ न येतां वाटोळा लावावी, व गंध उभे आडवें ज्यांस जसे पाहिजे तसे लावावे. कोणी मातबर असतील त्यांच्यापुढे गंध व अक्षत ठेवीत जावी. व हातास लावण्याचे गध देते समयीं भागीरथीचा गुलाब* वाटींत पुढे ठेवीत जावा. गंध, अक्षता लावणार यांणी नखे काढून बोटे चांगली करून लावावें.... । ता. ८-१-१७८३ । बालपेशव्याचा दिनक्रम काव्येतिहाससंग्रह, ले. ३९३, पृ. ३३९, (पौष शु. ६ श. १७०४ [ [‘पेशवाईतील राजपुत्रांचे शिक्षण' या विषयाची या पत्राने बरीच कल्पना येईल.] । श्रीयासह चिरंजीव राजश्री माधवराव प्रधान यांसि प्रती गोपिकाबाई । मुक्काम नाशिक अशीर्वाद उपरि येथील कुशल तागायत छ ४ माह से जाणून स्वकीनं कुशल वर्तमान यथास्थित असे विशेष. तुम्हीं पत्र पाठाने ते पावले. | " मी लहान, वडीलीं सर्व-त्याग करून श्रीक्षेत्रीं वास केला आहे, त्या सर्व माहित वडिलांस, यास्तव कोण रीतीने चालावे हे सर्व ल्याहावयास " व्हावी. म्हणोन लिहिले. त्यास सूर्यग्रहणसंधि अन्वयें कृष्ण पक्ष हो लोप जाहला होता, तो हल्ली पुण्योदयें करून दृष्टांचा संहार व सुष्टांचे

  • गुलाबपाणी व गंगा एकत्र मिसळलेली.

१ नारायणरावाची आई. ही विरवतीने नाशिकला जाऊन राहिली हा २ स्वकीय. ७८] ।