पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास दुस-याचे क्षुद्र काढू नये. येणे करून त्याचा अपमान होतो, आणि तो त्याचे मनांत दंश राहतो, साधल्यानुरूप नाश करील. आणि आपल्यास लघुपणा येईल. संन्निधानी' लोभांत लघुमनुष्य राखल्यास जे केले त्यास ते रुकार देतात, परंतु जन लोक वाईट म्हणतात, थोरपणास हानि होती. येणेप्रमाण घटी तीन. येकूण घटी अकरा. | कलम ४ १. भोजनाचे पूर्वी सोवळे जाहले नंतर थोरल्या देवघरांत जाऊन, फुले घालून, नमस्कार करून, ब्राह्मणांस उदक सोडुन, भोजनास वसावे. ते समय भाषण करणे ते राजसुययज्ञांतील ब्राह्मणभोजन प्रकरणे वगैरे योग्य सवास दिसेल ते बोलावे. पाक करणार व शिष्य मंडळी सुशिक्षित विश्वासुक असतील ते बाळगावे. घटी २. येणेप्रमाणे घटी १३. कलम ५ । १. भोजनोत्तर आचमन करून शतपदी' करून तांबूल घ्यावा. नंतर दोन घटिका राजविलास खेळ खेळावे. येणेप्रमाणे घटी २. येकूण घटी पघर: कलम ६ | १. शास्त्री यांजवळ विराटपर्वापासून भारतांतील चिंतनिका करात असावी; व वृद्ध मनुष्ये पदरची बहुत दिवशीं व अन्यत्र शहाणे असता त्यांशीं दिल्लीप्रकरणीं व महाराज प्रकरणी गोष्टी कशा जाहल्या त्या ऐकण्या असाव्या. आपले वडिलांच्या गोष्टी कारभारी यांसि एकांत स्थळीं विचार असावे; व तसविरा व नकाशे अनेक पहात असावे. ते समयीं शाहाणे बु%ि मान् असतील ते जवळ असावे. येणेप्रमाणे घटिका चार. एकूण घटिका १९ | कलम ७. शानी १. खर्डे लिहावयास बसावे. ते समयीं एक दोन मुलें संभावित गृहस्था बुद्धिमान पहावयास असावीं. करदन बस्तन गुणाकार भागाका करावयाचा सराव वहुत असावा. गुरुजी यांणीं विद्याभ्यासाकरितां बोलण. प्राप्त आहे. परंतु लिहावयाचे जागीच बोलावे. तेथे विशेष कोणी असो न घटी चार. एकूण घटिका तेवीस. कलम ४ १ जवळ. २ हलका. ३ स्वयंपाक, ४ शतपावली. ५ मनन. ६ दिवसाप' ७ बेरीज वजाबाकी. ८ ताळा. ९ रागे भरणे. ८० ]