पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेचक व सूचक स्फुट माहिती । २५९ ४ । । । वेचक व सूचक स्फुट माहिती प्रा. श्री. म. माटे ] [ रोहिणी, जुलै १९४७ | --इ. स. १६६२ त ईस्ट इंडिया कंपनीने चार्लस्कडे तक्रार केली की, कंपनीशी कोणाचाहि संबंध नसतां कित्येक इंग्रज हिदी गलबते चालवितात, आणि गलबतें बांधावयाचे व चालवावयाचे कसबहिं ते हिंदी लोकांस शिकवितात. म्हणून चार्ल्सने आज्ञापत्र लिहिलें कीं अशा लोकांना धरून इंग्लंडांत पाठवावे. --इ. स. १६६९७ त हैबतराव उंब्रजच्या अधिका-यास लिहितो, औरंगजेबाने मुसलमानांना जकातीची पूर्ण माफी दिली असून हिंदू लोकांबर मात्र त्या पूर्ववत् ठेविल्या आहेत. स्त्यिांना अशी सवलत देण्यात आली आहे की, त्यांनी त्या निम्या द्याव्या -इ. स. १६७१ त सुरतेच्या अधिका-यांनी कंपनी सरकारास लिहिले कीं भीमजी पारख या नांवाच्या कंपनीच्या दललाने कांहीं ब्राह्मणी लिखाण छापण्याकरितां इंग्लंडांतून एक मुद्रक मागविला आहे व त्याचा पगार देण्याचे त्यांनी पत्करलें आहे. -इ. स. १६७३ त मुंबईकर इंग्रजांनी जाहीर केले की मुंबईतील आणि शेजारच्या बेटावरील सर्व ख्रिस्ती लोकांनी इंग्लंडमध्येच बनविलेल्या कापडाची वस्त्रे वापरावी अशी आमची उत्कट इच्छा आहे.