पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अर्कटचा वेढा २६५ तटावरून गोळया लागतांच ते मागे फिरले व त्यांच्याबरोबर असणा-या लोकांसत्र त्यांनी तुडविले. वायव्येकडील बाजूस पडलेल्या खिंडारासमोर जो खंदक होता तो तरुन येण्यासारखा होता. तेव्हां त्या खिंडारांत जितके मावतील तितके लोक घाईघाईने हल्ला करण्यास पुढे सरसावले व बाकीचे लोक बुरुजाजवळ आसन मांडून बसले होते. लढणारे दमले म्हणजे हे विसांवा घेणारे पुढे सरसावणार होते. तटावरील शिबंदीच्या लोकांनी गोळ्या झाडण्यापूर्वीच हल्ला करणा-यांपैकी कांहीं खंदकांतून पसार होऊन पुढे आले होते, परंतु लवकरच गोळीबारास सुरुवात झाली. हा गोळीबार कांहीं वेळ झाल्यावर हल्ला करणारे में पतले. नंतर थोड्या वेळाने दुसरी टोळी आली व नंतर तिसरीहि आली. परंतु या सवरा वरीलप्रमाणेच धडकावून लावले. नंतर तटावरून बाँबगोळे फेकण्यांत आले व ते नेमके आसन मांडून वसलेल्या लोकांत पडले त्याबरोबर ते लोक सैरावैरा पळून गेले. । तटावरून सोडलेल्या तोफांचे नेम बरोबर लागत नाहींत हे पाहून के. वलाइव्ह तिकडे वळला व त्यांच्यांत अचूकपणा आणला, त्याबरोबर हल्ला करणान्यांमध्ये गोंधळ उत्पन्न होऊन कित्येक खंदकामध्यें गड़बड़त पडले. अशा रीतीने एक तास युद्ध झाल्यावर चंदासाहेबाच्या फौजेने युद्ध थांबविले व पडलेली प्रेते शिबिरांत वाहून नेण्याचे काम सुरू केले. दरवाजावरील हल्ल्यांत टोळीचा नायक मरण पावला. त्याला एका शिपायाने मोठ्या धोक्यां'तून खंदकांतून वाहून नेलें. तो स्वतःच तटावरून चाललेल्या गोळीबारांत मेला नाहीं हें आश्चर्य ! त्यांची अशीहि अपेक्षा दिसली कीं, प्रेत वाहून नेत असतां शिबंदीचे लोक गोळ्या झाडणार नाहीत. या हल्ल्यांत एकंदर ४०० माणसे मृत व जखमी झाली. पण त्यांत फ्रेंच लोक अगदीच थोडे होते, कारण फ्रेंचांची टोळी हा हल्ला चालू असतां दूर उभी होती ! | दोन तासांनंतर शत्रूने किल्ल्यावर पुन्हा हल्ला चढविला तो दुपारी दोन वाजेपर्यंत चालू होता. दोन वाजतां उभयपक्षी तात्पुरत्या विश्रांतीचा करार ठरला. या काळांत मुडदे पुरण्यांत आले. पुन्हां चार वाजतां लढाई सुरू झाली ती पहांटे २ वाजेपर्यंत चालू होती. परंतु पहाटे एकाएकी बातमी आली कीं हल्ला करणारे सैन्य किल्ला सोडून पसार झाले. ही आनंददायक वार्ता कळतांच किल्ल्यावरील शिबंदीचे शिपाई शत्रूच्या तळावर गेले व तेथे पडलेले त्यांचे