पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्लासीची लढाई व तिचे परिणाम २७१ नबाबास पाठिंबा देण्याचे कबूल करून दिल्लीहूनहि त्याच्या नबाबीस मान्यतेचे फरमान आणून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर नवाब व कंपनी यांच्यामध्ये जगत्शेटच्या विद्यमाने करार ठरला. या करारांत कंपनीस द्यावयास लागणा-या नुकसानभरपाई इतकी रक्कम (दीड कोट रुपये) खजिन्यांत नव्हती म्हणून तूर्त आम्ही अर्धी रक्कम घ्यावी व अध्र्याची तीन वर्षात तीन हप्त्यांनी फेड करावी असे ठरले. या अध्र्या रकमेपैकीं कांहीं भाग हि आम्हांस रत्नांच्या रूपाने घ्यावा लागला. नबाबाने सिराजउद्दौल्याच्या शोधार्थ मनुष्य पाठविला आहे. कित्येक दिवस तो सांपडत नव्हता. परंतु अखेर त्यास राजमहालनजीक पकडण्यांत आले. व ता. २ रोजी रात्री मुर्शिदाबादेस आणले. नबाबाच्या मुलाने (असे म्हणतात कीं) त्याची संमति न घेतांच सिराजउद्दौल्याचा खून केला. दुसरे दिवशी सकाळी नबावाने माझी भेट घेऊन राजकारणाच्या दृष्टीने हैं। सर्व आवश्यक होते असे समर्थन केले. सिराजउद्दौल्यास सहाय्य करण्यासाठीं फ्रेंचांची एक तुकडी येत होती परंतु त्यास पकडल्याची वार्ता ऐकून ती परत गेली असे विश्वसनीय रीत्या कळते. बंगालच्या गादीवर या नबाबाचे आसन स्थिर राहील असा रंग दिसतो. एकंदरीत प्रांतांत शांतता नांदत आहे व दिल्लीहून स्वारी होण्याची जी कांहीं भीति होती तीहि आतां नष्ट झाली आहे. एकंदरींत ही दूरगामी स्वरूपाची राज्यक्रांति सर्व दृष्टीने पूर्ण झाली आहे असे म्हणण्यास हरकत नाहीं. हिचे महत्त्व लक्षात घेऊन तुम्ही आणखी सैन्य व राज्यकारभार करण्यास लायक माणसे पाठवाल असा मला भरंवसा वाटतो. अभ्यास :--" प्लासीच्या लढाईचे लष्करी दृष्ट्या महत्त्व फारसे नाहीं. राजकीय दृष्ट्या मात्र फार आहे. या विधानाचे स्पष्टीकरण करा. [ १७