पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८३ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास या प्रवृत्तीने आपल्याला हिंदुस्थानांत केवढा तरी खर्चाचा बोजा सोसावा लागला व रजतपात करावा लागला म्हणून यापुढे तेथील सरकारने होता होईतों युद्धाचा प्रसंग आणू नये. अर्थात् आत्मसंरक्षणासाठी शस्त्र उपसावे लागल्यास नाइलाज आहे. देशी संस्थानिकांमधील देण्याघेण्याचे व्यवहारविशेषतः आपल्या छायेखाली असलेल्या देशी संस्थानिकांचे कर्ज व्यवहारनिश्चित व कायम करण्यासाठी एक स्वतंत्र लवाद मंडळ नेमण्यांत यावे. । कंपनी सरकारने यापुढे आपला राज्यकारभाराचा खर्च वाढू देऊ नये, यावर सक्त नजर ठेवावी. कोणत्याहि कारणाने खर्चात वाढ करावयाचा झाल्यास पार्लमेंटची अगोदर संमती घ्यावयास पाहिजे. । कंपनीचे जे नोकर कंपनीचा अधिकार किंवा तावा मानणार नाहीत किंवा येथून गेलेले हुकूम पाळणार नाहीत त्यांना कोणती शिक्षा द्यावा है बिलांतच सांगितलेले आहे. आतांपर्यंत पार्लमेंटच्या पद्धतीने त्या प्रत्येकाचा मौकशी करणे हे मोठे दिरंगाईचे ठरले आहे. यापेक्षा अधिक झटपट चौकशी मार्गाचा अवलंब केला पाहिजे. यासाठी एक स्पेशल कमिशन नमात्र त्याच्यावर पुरावा कायद्याचीं कांटेकोर बंधने असू नयेत. मात्र शपथपूर्वक सदसद्विवेक बुद्धीला धरून आपले काम करावे. या स्पेशल कमिशनला हि स्थानांतून पुरावा गोळा करण्याचा अधिकार असावा. हिंदुस्थानांतः गु'९' घडत असतां तेथे हजर असणा-यापैकी कोणी साक्ष देऊ केली तर ती सा या कमिशनला घेता यावी. तसेच या कमिशनला न्यायदानावरोदरच पुरा व्याची छाननी करण्याचाहि अधिकार असावा. । अभ्यास :--राज्यकारभाराची देखरेख बोर्डाकडे व व्यापाराचे व्यवः हार तेवढे कंपनीकडे या व्यवस्थेतील दोष सांगा. व्यापार व्यवहारा नावाखाली कंपनीच्या नोकरांनीं अरेरावी केल्यास बोर्ड काय करू शक या भाषणांत प्रतिपादिलेले शांततेचे धोरण कंपनीने पुढे कितपत पाळले ३४ |