पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास पर | वेलस्लीची तडफ पू. रे. प. व्य. भाग ६ वा, पुना अफेअर्स । (फोर्ट विल्यम १७९७-१८०१ नं० १२४ ८-७-९८ लॉर्ड वेलस्ली-पुणे रेसिडेंट, पुढील मुद्यावर तुम्हांस लवकरच सूचना मिळतील त्याप्रमाणे वागू लागावें. : | टिपूच्या गैरवर्तनाबद्दल जाव मागण्याबाबत पेशव्याने आपल्याशी सहकार्य करावे अशी मागणी तुम्ही पेशव्याकडे करा. | पेशव्याने कांहीं लष्करी मदत मागितल्यास एक युरोपियन पलटण, दोन हिंदी पलटणे आणि तोफांची एक कंपनी इतकें साहय त्यास द्या. हे सैन्य तुम्हीं मुंबई सरकारकडून मागावे. त्यांना मी परस्पर पत्र पाठवून तुमची मागणी पुरविण्याविषयी लिहीत आहे. | पण पेशव्यास अशा रीतीने मदत करण्यापूर्वी त्याने दोन गोष्टींस संमति दिली पाहिजे. एक इंग्रज हे निजामाच्या दरबारी असलेली आपली फौज वाढवितील व दुसरें निजाम व पेशवा यांचेमधील वाद इंग्रजांकडे लवाद म्हणून सोपविला जाईल. वरील अटी पेशव्यावर वंशपरंपरा बंधनकारक समजल्या जातील. पेशव्याने ह्या अटी कबूल करीपर्यंत त्यास कसलीच मदत द्यावयाची नाहीं. शिद्यास आपल्या राज्यांत जाण्यास सल्ला द्या. शिदे दक्षिणेत आहेत तोंवर त्यांस आमच्या संरक्षक मैत्रीचा फायदा मिळणार नाही हे सांगा. | अफगाणिस्तानच्या झमानशाहाचे पत्र आले असून त्यांत तो कंपनीला शिद्याविरुद्ध मदत करण्यास बोलावीत आहे, पण शिदा जर उत्तरेस आपल्या राज्यांत जाईल तर झमानशाहाच्या विरुद्ध त्याचे रक्षण करण्यास आपण तयार आहोत असे सांगा. शिदा उत्तरेस जाण्याचे नाकारील, किंवा आपल्या किंवा पेशव्याविरुद्ध उठेल, तर त्याच्याविरुद्ध युद्ध पुकारण्यास तुम्हांस अधिकार आहे. | भोसल्याने मागितल्यावरून मी त्याच्या दरबारकडे रेसिडेंट लवकरच पाठविणार आहे. या बातमीचा योग्य तो उपयोग करा. अगदी जरूर पडल्याखेरीज प्रकरण हातघाईवर आणू नका. ३८]