पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास वर्मक श्रद्धा व धार्मिक आचार या कारणांसाठी कोणाचाहि पक्षपात होऊ नये, कोणालाहि उपद्रव वा अस्वस्थता पोहोचू नये व कायद्याचे समान व निःपक्षपाती संरक्षण सर्वानच मिळावे अशी आमची--राणीसाहेवांची इच्छा आहे व हाच आमचा आनंद आहे असे आम्ही जाहीर करतो. | आमच्या हाताखालील अधिका-यांना आम्हीं असें सवत बजावतों व आज्ञा करतों कीं, आमच्या आत्यंतिक अवकृपेचे दुःख होऊ नये म्हणून त्यांना आमच्या कोणाहि प्रजाजनाची धार्मिक श्रद्धा किंवा पूजाअर्चा यांमध्ये ढवळाढवळ करण्यापासून अलिप्त रहावें. आणि अशी आमची आणखी इच्छा आहे की, आमच्या प्रजाजनाना मग ते कोणत्याहि जातीचे वा पक्षाचे असोत, जर शिक्षण, कर्तबगारी व प्रामाणिकपणा यामुळे नोकरींतील कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडण्याची पात्रता आली असेल तर सरकारी नोकरीत सहज व निःपक्षपातीपणाने प्रवेश मिळावा. खोटा प्रचार करून व बंडाला प्रवृत्त करून आपल्या देशबांधवांचा दिशाभूल करणा-या महत्त्वाकांक्षी लोकांच्या कृत्यांनी हिंदुस्थानभर ओढवलेला दुःस्थिति पाहून आम्हांस फार दुःख वाटत आहे. रणक्षेत्रावर बंडाचा बीमोड करून आम्ही आमचे सामर्थ्य प्रत्ययास आणलेच आहे, आतां अशा रीतीने दिशाभूल झालेल्या व पूनः कर्तव्याच्या मार्गाकडे वळण्याची इच्छा करणा-यांना क्षमा करून आमचे दयालुत्व दाखविणे ही आमची इच्छा आहे. ज्यांच्यावर ब्रिटिश प्रजाजनांचा खून करण्यामध्ये प्रत्यक्ष भाग घेत ल्याचा आरोप आला आहे किंवा येण्याची शक्यता आहे त्यांच्याशिवाय इतर सर्व अपराध्यांना आमच्याकडून क्षमा केली जाईल. तुनी इसमावर दया दाखविण्यास मात्र आमची न्यायबुद्धि आम्हास मनाई करीत आहे. सरकारविरुद्ध शस्त्र उचलणान्या इतर सर्वांचे व्यक्तिशः आमच्या विरुद्ध, राजपदाविरुद्ध व आमच्या दर्जाविरुद्ध झालेले अपराध--ते आपल्या वरीं येऊन शांततेचे व्यवहार सुरू करतील तर–विसरून सरसकट बिना माफ करण्याचे वचन आम्ही जाहीर करीत आहो. ईशकृपेने अंतर्गत शांतता प्रस्थापित होईल तेव्हां हिंदुस्थानाता उद्योगधंद्यांना उत्तेजन देणे, जनतेच्या उगयोगाच्या व सुधारणेच्या कामान ६० ]