पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| ३१८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास पितांना आढळतील, इतका राज्यकर्त्यांचा सर्वास दरारा आहे. अशा स्थितींत कदाचित् कांहीं असंतुष्ट गट मनांतुन राणीचे राज्य उलथून पडावे अशी इच्छाहि करीत असतील. परंतु खरे म्हटले तर हे सर्व असंतुष्ट आत्मे द गट नुसती घुगुरटी आहेत. यांनीं वदाचित् चावा घेतला तरी तेवढ्याने काही गंभीर प्रश्न उत्पन्न होण्याचे कारण नाहीं. राष्ट्रपुरुषाचे चित्तांत यामुळे कांहीं अन्यथा विचार आला असे मानण्याचे कांहीं कारण नाही. देशाच हृदय शाबूत असून आपले काम करीत आहे. शिपायांच्या बंडासारख्या अग्निदिव्यांतूनहि ते सहीसलामत बाहेर पडले. प्रस्तुत मरहूम मेयासाहेबांचा खून झाला याबद्दल आम्हांस वाईट वाटते; परंतु या खुनासारख प्रकार हे ब्रिटिश राज्यकत्र्याबद्दल जनतेच्या ज्या भावना आहेत त्यांचे निदर्शक होत, असे कुणी मानील तर आम्हांस अधिकच वाईट वाटेल. अभ्यास :-कायद्याच्या काटेकोर मर्यादेत राहन प्रामाणिकपणाने आपले मत व्यक्त करून जनतेस राष्ट्रीय विचाराचे बाळकडू पाजणाच्या तत्कालीन १ पत्रीय भाषेचा काळजीपूर्वक अभ्यास करा. अशा सफाईदार लेखांचा संग्रह करा: ४२ । बंड व विद्वत्ता’ : १८५९मधील ज्ञानप्रकाशाचे मत [ इंग्रजी राज्य सुरू झाल्यावर मराठींत वृत्तपत्रे निघू लागली. परंतु १२ फेब्रुवारी, १८४८ ला निघालें व आजहि चालू आहे असे मराठी वृत्तपत्र म्हणजे पुण्याचा ज्ञानप्रकाश होय. त्याने १०१ व्या वर्षात पदार्पण केल्याच्या आनंदाबद्दल, १२ फेब्रुवारी १९४९ ला सर्वपक्षीय समारंभ पुण्यास करण्यांत आला. प्रारंभीं हैं वृत्तपत्र शिळाप्रेसवर छापलेले असे. गुरुवार ता. १७ मार्च सन १८५९ च्या अंकातील ४ थ्या पृष्ठावरील पहिल्या स्तंभाचा ठसा पुढे दिला आहे. त्या वेळी पृष्ठाचा आकार-१२”X९" असून प्रत्येक पृष्ठांत २ स्तंभ व एकूण अंक ४ पृष्ठांचा असे. १८५७ च्या स्वातंत्र्य यद्धाची तत्कालाला अनुरूप अशी चर्चा या अंकांत आलेली आहे. हा लेख २॥ पृष्ठे म्हणजे जवळ जवळ निम्मा अंक झालेला आहे.] ६४]