पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• प्रिन्स ऑफ वेल्स यांस 'अनावृत' पत्र ३२३ ४५ । । प्रिन्स ऑफ वेल्स यांस 'अनावृत’ पत्र कलकत्त्याचा हिंदु पेट्रियट } { २७-१२-१८७५. [इ. स. १८७५ सालीं राणी व्हिक्टोरियांचे ज्येष्ठ चिरंजीव एडवर्ड--नंतरचे सातवे एडवर्ड--हिंदुस्थानांत आले त्यांस उद्देशून : -मुजुमदार, पृ. १०५ ] ....*आपल्याला ४ महिन्यांत सर्व देश हिंडून कितीशी लोकस्थिति कळणार? त्यांतच आपण जेथे जातां तेथे सरकारने आधीच सजावट करून सर्व रस्ते इ. आकर्षक केलेले असतात. अर्थात् आपण पहातां तो सर्व कृत्रिम वरवरचा देखावा आहे, खरा नव्हे. आपण समजाल की संपत्ति व श्रीमंती या देशांत उतू चालली आहे. परंतु वस्तुस्थिति अगदी उलट आहे. राणीच्या राज्याविरुद्ध लोकांची तक्रार नाही. परंतु तिने काढलेल्या जाहीरनाम्याविरुद्ध येथील अधिका-यांची वागणूक पाहून लोकांना दुःख होते. नुसतीं शृंगारलेली शहरें पाहून भुलून जाऊ नका, आमच्या देशांतील दुःस्थितीचे तीं शहरें निदर्शक नव्हेत. इंग्लंडांत परत जाल तेव्हा तुमच्या व आमच्या मातोश्रींनाहि ही गोष्ट सांगा की जें जें चकचकीत तुमच्या नजरेस पडलें तें सारें सोने नव्हते. आमची तक्रार आपल्या घराण्याविरुद्ध नाहीं. येथील राज्यपद्धतीबद्दल आहे. आपल्या आगमनाप्रीत्यर्थ हिंदुस्थानने लाखो रुपये खर्च केलेले आहेत, आणि जर यामुळे महाराणी व्हिक्टोरिया, आपण व राज्याधिकारी यांचे मनांत कांहीं सक्रिय सहानुभूतीचा उदय झाला तर या पैशाचा पूर्ण मोबदला मिळाला असे हिंदुस्थानला वाटेल. आपणास दीर्घायुष्य व आरोग्य लाभो ! अभ्यास :–इ. स. १८७५ च्या सुमारास हिंदुस्थानांत पडलेल्या दुष्काळाची माहिती मिळविल्यास या अग्रलेखांतील विचारांचा समर्पकपणा बरोबर लक्षात येईल.

  • प्रारंभीं प्रिन्स ऑफ वेल्सचे गुणवर्णन केल्यावर हा मजकूर लिहिलेला आहे.

[६९