पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पन्नास वर्षांपूर्वीचे पुत्रे ३३३ घरकामासाठी तीन वजतां उठावें लागे त्या काळा बायकाना उजाडापयत झोपून राहतां येत नसे. घरांत कामें करण्यासाठी त्यांना पहाटे तीन वाजतां उठावें लागे व प्रथम दळण घरीच करावें लागे. चार वाजेपर्यंत प्रत्येक घरांत गाण्याचे सूर व जात्याची घरघर त्या वेळीं ऐकू येई व चार वाजले कीं, बायका पाण्यासाठी बाहेर पडत. कारण ५u। वाजण्याचे आंत निदान ब्राह्मणेतर बायकांना तरी पाणी उरकावें लागे. त्या वेळीं प्रत्येक पेठेत दोन तरी हौद असत व या दोन हौदांवर सर्व पेठेचे पाणी भरणे चालेया हौदांवर ५ वाजतां ब्राह्मण पुरुष स्नानासाठा येत व त्या वेळीं मात्र बायकांनीं तिकडे फिरकावयाचें नाहीं, येवढंच काय पण ब्राह्मणेतर पुरुषांनी तेथे पाण्याला किंवा आंघोळीला जावयाचें नाहीं असा परिपाठ असे व तो आळीकर मंडळी मोठ्या आस्थेने पाळीत. ब्राह्मण मंडळी देवाची प्रार्थना करण्यासाठीं हैं करतात व त्यांना हें कई दिल्याने आप णालाहि पुण्य लागतें असें सर्वांना बाटेम्हणून कोणी त्या वेळीं ब्राह्मणांचे वाटेसच जात नसत. ८ च्या सुमारास ब्राह्मण मंडळी होदावरून जात व मग सर्व जातींचे या हौदावर पाणी भरणे वगैरे व्यवहार चालत असत. त्या वेळीं सदासर्वकाळ पुण्यांतील हौदांतून पाणी वहात असे व हे हौद दर महिन्याला वर्गणी काढून स्वच्छ केले जात. विधवांना या हौदांवर पाणी भरण्यास परवानगी नसे व ब्राह्मण स्नान करीत असतांना कोणीहि विधवेनें समोर जावयाचें नाहीं असा नियम' असे. संध्याकाळी ५ वाजतां पण ब्राह्मण अयं देण्यासाठी या हौदांवर येत, त्या वेळींहि हाच नियम पाळला जाई पैशाच्या कबडवांत बाजारहाट त्या वेळीं कवडया व्यवहारासाठी बाजारांत चालत व या कवड्या घेऊन शनिवारवाड्याच्या जवळच्या बाजारात मुलें विक्रीसाठीं बसत. एका पेशाला त्या वेळीं ९६ कवडच मिळत व तेवढया कवड्या घेऊन बाजारांत [ ७९