पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास च्या धारेप्रमाणे तळपणाच्या वर्तमानाच्या कांठावर मी उभा असतांना माझे मन किंचित् साशंक होते व पुढे असलेल्या कठीण जवाबदारीच्या जाणिवेने माझे मन भारावून जाते. भारताच्या इतिहासांत आपण एका विशिष्ट क्षणापर्यंत येऊन पोहोंचलों हों. जुन्यांतून नव्या युगाचा उदय होत आहे. या संक्रमणाच्या क्षणांत खरोखरच कांहीं जादू आहे की काय ते मला माहीत नाही, परंतु मला मात्र ती भासते. रात्रीच्या अंध:कारांतून जेव्हां दिवसाचा उजेड प्रकाशमान होतो तेव्हां ज्या प्रकारचा अतक्र्य आनंद होतो व सृष्टीच्या अतक्र्य जागिरीत मन रममाण होते तशा प्रकारच्या आंनदांत माझे चित्त गुंतून राहिले आहे. हा उगवणारा दिवस कदाचित् अन्नपटलांनी व्याप्त असेल, परंतु काही झाले तरी दिवस तो दिवसच. एकदां आकाश निरभ्र झाले, की आपणांस सूर्यदर्शन होणारच ! " अभ्यास :--पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळोख व सूर्यदर्शन • संबंधींच्या अलंकारपूर्ण दृष्टांताचे संपूर्ण स्पष्टीकरण करा. २ ; ; ; भारतसंघांत संस्थानांचा प्रवेश (५ जुलै १९४७) [ १५ ऑगस्ट १९४७ ला आपला देश द्विखंड होऊन स्वतंत्र झाला. पाकिस्तान सोडून राहिलेल्या हिंदूस्थानमध्ये ५६५ देशा संस्थाने होतीं. मूळच्या हिंदुस्थान देशाचा ४५ टक्के प्रदेश संस्थानांत होता. एकूण लोकसंख्येपैकी २४ टक्के म्हणजे ९ कोटी ३२ लक्ष लोक या भागांत रहात होते. आपल्या देशांत असलेल्या ५६५ संस्थानांपैकी ५५० संस्थाने एका वर्षाच्या अवधींत हिंदुस्थान सरकारने भारतसंघांत समाविष्ट केली. अद्यापहि हे कार्य चालू आहे. कांहीं संस्थाने हिंदी संघांत पूर्णपणे विलीन झाली, कांहीता आपले संघ करून व कांहींनी पथकपणे हिंदी संघराज्याकडे संरक्षण, परकीय संबंध आणि दळणवळण हीं खाती दिली. संस्थान संघांत किवा पृथक् गटांत लोकप्रतिनिधींच्या हातांत सत्ता देण्यात येऊ लागला २]