पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कॉमनवेल्थमध्ये राहण्याची घोषणा या सर्वसंमत कराराचे सार हेच की हिंदुस्थानांत लोकराज्य स्थापन झाल्यावरहि हिंदुस्थान राजमुगुटोस कॉमनवेल्थ संघाच्या ऐक्यतेचे प्रतीक म्हणून मान्यता देईल; परंतु हिंदुस्थान में स्वतंत्र लोकशाही राज्य राहील. राजा हा हिंदुस्थानचा राजा असणार नाहीं. हिंदुस्थानचा लोकनियुक्त अध्यक्ष हा हिंदुस्थानचा राजकीय प्रमुख म्हणून सर्व प्रकारचे अंतर्गत व परराष्ट्रीय व्यवहार स्वतःच्या मुखत्यारीने पाहील. परंतु हिंदुस्थान हा कॉमनवेल्थचा सभासद असल्याने राजाला कॉमनवेल्थच्या ऐक्यतेचे प्रतीक म्हणून दर्जा राहील, याचा अर्थ राजाला कॉमनवेल्थच्या घटनेत दोन प्रकारचे स्थान आहे (१) कॉमनवेल्थ संघाच्या ऐक्यतेचे प्रतीक म्हणून व (२) हिंदुस्थान वगळून ज्या कॉमनवेल्थच्या देशांनी त्याला राजा म्हणून मान्यता दिली त्यांचा राजकीय प्रमुख असा राजा म्हणून. हिंदुस्थान में सार्वभौम लोकराज्य झाल्यावरहि हिंदुस्थानला कॉमनवेल्थमध्ये समान दर्जावर ठेवण्यास कॉमनवेल्थने मान्यता दिलेली आहे व त्या सभासदत्वाच्या सर्व सवलती मिळण्यास हिंदुस्थान पात्र आहे. ही वरील घटना तपशीलवार स्पष्ट करून सांगणारा असा एक खलिता कॉमनवेल्थच्या सभासद राष्ट्रप्रमुखांनी आपल्या सहीनिशीं प्रसिद्ध केला आहे. प्रश्न :–हिंदुस्थान हा कॉमनवेल्थचा सभासद राहिल्याने हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वास ‘तात्त्विक नसल्या तरी प्रत्यक्ष स्थितींत कांहीं मर्यादा उत्पन्न होतात की नाही ह्याचे विवेचन करा. देशांतील दुफळीचा शेवट सरदार पटेल यांचे भाषण [ ब्रिटिश राजवटींन मुसलमान, शोख, ख्रिस्ती, अँग्लोइंडियन, हरिजन ३. जमातींना स्वतंत्र मतदार संघांतून कायदेमंडळांत प्रतिनिधित्व होते. यालाच विभक्त मतदारसंघाची पद्धति म्हणतात. स्वातंत्र्यकालांत हीच पद्धति चालू ठेवावी किंवा काय योजना करावी या प्रश्नांचा विचार करण्यासाठीं घटनासमितीने एक उपसमिति नेमलेली आहे. या समितीने मुसलमान, प्रिस्ती, शीख इत्यादींच्या बाबतींतील ही स्वतंत्र मतदार