पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/102

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रकूटांचा कृष्णराज याचे दानपत्र ६९ ॐ .... मुरारीच्या करपल्लवाचा विजय असो ...... कुमुदिनीनाथ (चंद्र) आहे..... त्याच्यापासून क्षितिपालवंश उत्पन्न झाला..... दुग्धसिंधूप्रमाणें (असलेल्या त्या वंशांत) मण्यांच्या माळेप्रमाणे यदुवंश निर्माण झाला..... याच वंशांत पुराणपुरुषाने (कृष्णाने) अवतार घेतला..... त्या वंशांतील शूर व कीर्तिमान राजपुत्र ‘तुग या नांवाने ओळखले जाऊ लागले. त्याच वंशांत, शत्रुच्या हत्तींचा संहार ज्यांनी केला असा पृथ्वीतलाचा भूषण ‘रट्ट उत्पन्न झाला; आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र राष्ट्रकूट याच्या नांवावरून (तो वंश) राष्ट्रकूट म्हणून जगांत प्रसिद्धीस आला ....... रट्टांचे सामर्थ्य टिकवावे अशी सामंतांनीं विनंति केल्यावरून जगत्तुंगाचा पुत्र अमोघवर्ष (या) वीरसिंहासनावर बसला.....तो धर्मामध्ये मनु, युद्धांत कातिवीर्य, लोकांचे मन आकर्षण करण्यांत दिलीप होता. उच्च स्थानावर असूनहि तो वृद्धाबरोबर नम्रतेने वागे. । .... परमेश्वरा ( शिवा ) ला .... शक्तिधर स्वामी कुमार झाला त्याप्रमाणे या भूपतीला श्रीकृष्णराज हा पुत्र झाला..... पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यंत व हिमालयापासून सिंहलद्वीपापर्यंत असलेले सामंत, दण्डभयाने त्याला नमस्कार करीत. मात्र श्रीकृष्णराज आपल्या पित्याच्या आज्ञेत असे. ( राज्याभिषेकानंतर) चोलांचे उन्मूलन करून त्यांची भूमि आपल्या आश्रितांना दिली; चेर, पांड्य, सिंहल, या मंडलाधीश्वरांना त्याने सामंत केलें; (या रीतीने) दक्षिण दिग्विजय करून कोतिलतांकुरदर्शक स्तंभहि रामेश्वर येथे त्याने उभारला. परम भट्टारक महाराजाधिराज परमेश्वर श्रीमत् अकालवर्षदेव श्रीमत् वल्लभ* नरेंद्रदेव हा, राष्ट्रपति, विषयपति, ग्रामकूट, पुढारी, आणि संबंधी लोकांना आज्ञा करतो : ‘सर्वाना विदित व्हावें कीं दक्षिण विभागांत माझ्या आश्रितांना h 1 भारताची प्राचीन सीमा येथे सहज सूचित झाली आहे. *कृष्णराजालाच अकालवर्षदेव आणि वल्लभ असेहि म्हणत.