पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/106

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काश्मीरच्या हर्षाची कथा ७३ | हर्षाचा शेवट हर्षदेव भुकेनें कासावीस झाला होता. त्याची प्रयागाने पुष्कळशी प्रार्थना केली. तेव्हां दारुण पुत्रशोकग्रस्त असतांनाहि त्याने थोडेसे अन्नग्रहण करण्याचे कबूल केले. पक्षाचे पिल्लं वरचेवर घरट्यांतून खायला आणणा-या मातापित्याची वाट पाहात बाहेर डोकावत असते, त्याप्रमाणे तो भिक्षेकरी केव्हां खावयाला आणतो म्हणून प्रयाग वरचेवर खिडकीतून बाहेर पहात होता. इतक्यांत त्या कुटीभोंवती शिपायांनी वेढा दिलेला दिसला आणि अंगणाच्या दाराचा अडसर काढण्याचा आवाज त्याला ऐकं आला. हा विश्वासघात करणारा तो भिक्षेकरीहि त्या शिपायांमध्ये होता. तो मुक्ताला बाहेर बोलावीत होता. यावर त्याने दाराची फळी उघडली आणि राजाने मुक्ताला बाहेर पाठविले व न भितां कमरेची लहान सुरी काढून हातांत घेतली. तोंवर एक धाडशी शिपाई नागवी तलवार हातांत घेऊन मोठ्या ऐटीनें चालून आला. त्याने अंगांत कवच घातले होते. तशा त्या कुटीच्या अडचणीच्या जागेतहि राजने त्याच्यावर हल्ला करून त्याला खाली पाडले, पण कृपाळूपणाने त्याला ठार केलें नाहीं.......दुसरा एक शिपाई झोपडीच्या छप्परांतून आंत उतरत आणि तिसरा वर चढत होता. राजा शस्त्र उगारून त्या पहिल्या शिपायाच्या पाठीवर वीरासनांत उभा असलेला पाहून त्यांची गाळण झाली व ते खाली पडले. त्या वेळी राजा हातांत दंड धारण करून रुरु दैत्याच्या पाठीवर उभ्या असलेल्या चामुंडेसारखा शोभत होता. . राजाचे हे शेवटचे लढणे वीरांचा सिंहनाद, रणवाद्यांचा उत्साहदायक शब्द किंवा उन्मत्त शस्त्रास्त्रांचा खणखणाट वगैरेंनीं शोभिवंत झालें नाहीं. उलट कांहीं शस्त्रधारी डामर हळूच त्या कुशीत शिरले व....त्या कोंडलेल्या राजाभोंवतीं गोळा झाले. पुढे आणखी एक जण छप्परांतून आंत उतरला आणि त्याने प्रयागाच्या खांद्यावर व डोक्यावर जोराने वार करून राजावरहि एकदम हल्ला केला आणि राज ने केलेला वार कांहींसा वांचवीत त्याने राजाच्या छातीत दोन वेळां खंजीर खुपसला. त्याबरोबर राजाने ‘महेश्वर महेश्वर' असे म्हटले व तो छिन्नमल वृक्षाप्रमाणे मरून पडला. तो चक्रवर्ती राजा असतांना, त्याला एखाद्या पळून जाऊन घरांत लपून बसलेल्या चोराप्रमाणे मरण आलें. अभ्यास: १ राजतरंगिणींतील आठवा तरंग वाचा. २. हर्षाच्या कथेबद्दल कल्हणाचे काय विचार होते ?