पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/109

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

19६ हिंदुस्थानची साधनरूप इतिहास उन्नतशरीराचा एक पुरुष अग्निकुंडांतून उत्पन्न झाला; तो अग्नीप्रमाणे तेजस्वी होता. त्याचे नांव चहुवान (चव्हाण) होय. या चव्हाणाने ब्राह्मणांचे रक्षण केले नि याच वंशांत पृथ्वीराज उत्पन्न झाला." अभ्यास :--टीपा लिहा : १. पृथ्वीराजरासो. २. राजपुतांच्या उत्पत्तीसंबंधी भिन्न सते. अकराव्या शतकांतील लोकस्थिति। [अल्-बिरूनीचे संपूर्ण नांव अबू रहन महम्मद इब्न अहमद अल्-बिरूनी हे होय. हा गणिती व तत्त्वज्ञानी म्हणून प्रसिद्ध आहे. खुरासान प्रांतांत खिवा येथे तो जन्मला. गज्नीच्या महमदानें तो प्रांत इ. स. १० १७ त जिंकला तेव्हा तेथील राजाबरोबर त्याच्या सल्लागारांपैकी एक म्हणून अल्-बिरूनीस गज्नीला नेले. तेथे काही दिवस त्यांस राजकीय कैदी म्हणून राहावे लागले असावे. महमुदाने जेव्हां हिंदुस्थानावर स्त्राच्या केल्या त्या वेळी त्याच्या बरोबर अल्-बिरूनी या देशांत आला असा संशोधकांचा तुर्क आहे. स्वदेशी परतल्यावर अरबो भाषत त्याने 'तहकीक-इ-हिंद' (हिंदुस्थानसंबंधी चौकशी) हा ग्रंथ लिहिला. तो इ स. १० ४८ त मृत्यु पावला. वरील ग्रंथाच्या प्रस्तावनेत तो लिहितो : ‘‘परकीयांचा धर्म अथवा चालीरीति यांचे सत्य व यथातथ्य वर्णन करणारे लेखक अगदी थोडे आढळतात. पण शास्त्रीय दृष्टीनें ग्रंथ लिहिणारांनी ही सत्यदृष्टि सोडून चालणार नाहीं... माझे पुस्तक म्हणजे केवळ जे घडले त्याचे इतिवृत्त होय." या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद डॉ. एडवर्ड सचौ (Sachau) यांनीं ‘अबिरूनीज इंडिया' या नांवाने इ. स. १८८८ मध्ये प्रकाशित केला. त्यानींहि अल्-बिरूनीच्या सत्यप्रतीची वाखाणी केली आहे. आपल्यास 'चक्षुर्वेसत्ये' अशी हकीकत लिहितां यावी म्हणून अल्-बिरूनीने या देशांतील वास्तव्याचा उपयोग येथील माहिती मिळवि यासाठी केला. त्यासाठी तो संस्कृत भाषा शिकला. त्याने आपल्या पुस्तकांत आधार म्हणून भगवदगीता, ब्रह्मसिद्धांत, विष्णु, वायु, मत्स्य, आदि पुराणे आणि अन्य ग्रंथांतील उतारे दिले आहेत. विद्वान व अविद्वान् अशा हिंदूंशी चर्चा करून त्याला जी माहिती मिळाली तीहि त्याने ग्रथित केली आहे. परकीयांस माहिती देण्यास हिंदू नाखूष असतात असा