पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/111

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ 7 हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास व व्याकरणाच्या नियमांनी बांधलेले; यालाच संस्कृत भाषा म्हणतात. या भाषेतील कांहीं ध्वनींचे उच्चार अरेबी व फारसी सारखे नाहींत; किंवा जवळजवळचेहि वाटत नाहींत. आपल्या जिभेने त्याचे उच्चार करणेच कठिण ...... आपल्या भाषेत (लिपींत) तो उच्चार लिहून व्यक्त करणेहि अत्यंत अवघड. संस्कृतांत शब्दांच्या मध्यंतरीं स्वर न येतां दोन किंवा तीन व्यंजनांनी अनेक शब्दांचा आरंभ होतो. ....हिंदूचे शास्त्रीय ग्रंथ छंदोबद्ध असतात .. त्यामुळे शब्दजाल वाढते. | दुसरा फरक म्हणजे धर्माचा. त्यांना ज्याबद्दल श्रद्धा आहे त्याबद्दल आम्हाला नाहीं, तसेच त्याच्या उलटहि .....सर्व परकीयांविरुध्द (वागतांना) त्यांचा धर्माभिमान जागृत होतो. ते त्यांना ‘म्लेंच्छ'–अपवित्र-मानतात, व त्यांच्याशी विवाह, रोटीव्यवहार अथवा पानव्यवहार करणे किंवा अन्यरीतीने संबंध ठेवणे निषिद्ध मानतात. असे केल्याने आपण अपवित्र होऊ अशी त्यांची समजूत आहे. नेहमीच्या व्यवहारांत, अस्वच्छ किंवा अपवित्र झालेली बस्तु पुन्हाः शुद्ध करून घेण्याची मनुष्य इच्छा करतो. पण एकदां अपवित्र झालेली वस्तु पुन्हा शुद्ध करावी आणि ती परत मिळवावी अशी हिंदूंची कधीच इच्छा नसते. त्यांच्या धर्माचे नाहींत अशा माणसाचे (परकीयांचे)-मग तो त्यांच्या धर्माकडे आकृष्ट होत असला तरीहि–स्वागत करण्याची त्यांना मनाई आहे. यामुळे त्यांच्याशी परिचय करणे. अगदी अशक्य होते. त्यांच्यांत आणि आमच्यांत (परिचय येण्याच्या आड) हा फारच मोठा खंदक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या व आपल्या सगळ्या चालीरीति आणि रुढीमध्ये इतका फरक आहे की, आपला पोशाख, वागणे, आचार यांमुळे त्यांची मुले आपणांस भितात. आपण पिशाच्च योनींतील आहों व आपल्या कृति अयोग्य आणि बेडौल आहेत असे त्यांना वाटू लागते. अर्थात् ओघाओघानें व न्यायाच्या दृष्टीने आपल्याला हे मान्य केले पाहिजे की, परक्यासंबंधींची अशी वृत्ति आपण व हिंदूंमध्येच आहे असे नसून सर्व राष्ट्रांतून दुस-या राष्ट्रांबद्दल ती आढळते. हिंदू आणि परराष्ट्रीयांतील भिन्नत्व आणखी वाढले याचे कारण श्रमण बर्ग ( वौद्धधर्मगुरु ). सामान्यतः ते ब्राह्मणांचा द्वेष करतात, पण आपल्या पेक्षा त्यांना ते ब्राह्मणच जवळचे वाटतात. खुरासान, इराक, सिरिया इ.