पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/112

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अकराव्या शतकांतील लोकस्थिति १७९ सर्व स्थानांत झरतुष्टाने आपला धर्म स्थापल्याने बौद्ध धर्माची तेथून हकालपट्टी झाली.....त्यानंतर इस्लामचे आगमन झाले. हिंदुस्थानवर त्यांच्या स्वाच्या सुरू झाल्या आणि परकीयांबद्दलचा तिटकारा हिंदूंमध्ये आणखी बाढला.•••• | ( या स्वान्यांच्या प्रसंगाने ) त्यांच्या हृदयांत (आपल्याबद्दल) कायमची घृणा ठाण' देऊन बसली (आहे.) ....गझनीच्या महंमदाने तर या देशाची समृद्धि उध्वस्त केली, आश्चर्यकारक पराक्रम केले, पण त्यामुळे धूलिकणासारखी हिंदूची सर्व दिशांकडे दाणादाण झाली ..... अर्थातच एकंदर मुसलमानांबद्दल त्यांच्या मनांत अत्यंत तिरस्कार मुरलेला असतो. । पांचवें कारण–जे सांगणे म्हणजे उपरोध केल्यासारखे वाटेल तें म्हणजे त्यांच्या राष्ट्रीय स्वभावाची वैशिष्ट्ये. त्यांच्यांत ती (लक्षणे) रुजलेली आहेत आणि प्रत्येकाला ती दिसू शकतात. आपण एवढेच म्हणू कीं, ज्याला औषध नाहीं असा ‘मर्खपणा' हाच एक आजार आहे. हिंदूंचा असा विश्वास आहे कीं, जगांत त्यांच्या देशाखेरीज दुसरा देश नाही, त्यांच्यासारखें राष्ट्र नाहीं, त्यांच्यासारखे राजे, त्यांच्यासारखा वर्म, विज्ञान अन्यत्र नाही. ते तापट,पोकळ अभिमानी, आपणास शहाणे समजणारे, आणि जडबुद्धीचे आहेत. त्यांचा स्वभावच असा आहे की, आपल्याला जे माहीत आहे ते दुसयास सांगू नये. त्यांच्या त्यांच्यांतसुद्धां परजातीयांपासून ते (ज्ञान) लपवून ठेवण्याची ते पराकाष्ठा करतील, अर्थातच परराष्ट्रीयांच्या बाबतींत सांगावयासच नको.. ....ते जर प्रवास करतील आणि दुस-या राष्ट्रांशीं मिसळतील तर त्यांची ही वृत्ति लवकर पालटेल, कारण ते जितके (आज) संकुचित वृत्तीचे आहेत तितके त्यांचे पूर्वज नव्हते. अभ्यास :--१ हिंदूची भाषा, धर्म, चालीरीति, परकीयांसंबंधीं तिटकारा, अहंकार यांसंबंधीं अल्बिरूनीने जे सांगितले त्यांत तथ्यांश असेल काय ? आजच्या स्थितीशी त्याच्या विचारांची तुलना करा. प्रकरण ५७ वें दान आणि आपली मिळकत मनुष्याने कशी खर्च करावी यासंबंधी प्रत्येक दिवशीं देतां येईल तेवढे दान त्यांनी देणे आवश्यक आहे.-. ...एक वर्ष नव्हे, तर एक महिनाहि ते लोक पैसे जवळ ठेवीत नाहींत.