पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/114

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

11 यादवकालीन दानपत्र ८१ च्या पूर्वेस साठ योजने अंतरावर आहे. पुढे गंगा, रहाब, कुही व सरयु या बारी शहराजवळ एकत्र मिळतात. हिंदूंचा असा समज आहे की, गंगा ही स्वर्गातून मृत्युलोकावर आली, तेथे ती सप्तप्रवाहांत वाहू लागली व त्यापैकी मध्यवर्ती प्रवाहास तेवढे गंगा में नांव प्राप्त झाले आहे. | यादकालीन दानपत्र [ चालुक्य घराण्यानंतर प्रसिद्धीस आलेले राजघराणे म्हणजे यादवांचे होय. बाराव्या शतकांत हें राजघराणे प्रतिष्ठा पावले व इ. स. १३१८त मुसलमानांच्या स्वाध्यांमुळे ते नष्ट झाले. या घराण्यात सिंघाण नांवाचा पराक्रमी राजा होऊन गेला. तो इ. स. १२१० मध्ये गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीतील दानपत्रांतील कांहीं भाग पुढे दिला आहे. एपिग्राफिया इंडिका भा. १, पृ. ३४४-४६] | ॐ गणपतये नमः । प्रसिद्ध भास्कराचार्यांचा विजय असो. (हे आचार्य) पूज्यपाद भट्टसिद्धांताचे विशेष अध्ययन केलेले, सांख्य-शास्त्रांत अद्वितीय, तंत्रशास्त्रांत स्वतंत्र विचार करणारे, वेदांचे परिर्ण ज्ञाते, यंत्रकलेमध्ये श्रेष्ठ होते.. | ज्या वंशांत भयभीत धरणीला वांचविण्यासाठी विष्णूचा अवतार झाला त्या कीर्तिमान यदुवंशाचे कल्याण असो.....(या वंशांतील विद्यमान राजा) सिंधाण याने चांगदेवास (या नांवाच्या गृहस्थास) आपला मुख्य ज्योतिषी (खगोलज्ञ) नेमले आहे. त्याने भास्कराचार्याच्या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी महाविद्यालय स्थापले आहे. सिद्धांत शिरोमणीचे आणि भास्कराचार्य आणि त्यांच्या घराण्यांतील इतरांनी लिहिलेल्या तत्त्वांचे अध्ययन (येथे) व्हावे हा मुख्य हेतु आहे. या महाविद्यालयास जमीन आणि इतर जे दान शौदेव आणि हेमाद्रि देव (मांडलिक राजे) यांनी दिले आहे, (त्यामुळे) धार्मिक गणांची वाढ होणार असल्याने नंतर येण्याच्या राजकत्र्यांनीहि त्याचे रक्षण करावे. शास्त. शके ११२८ प्रभवनाम संवत्सर, श्रावण पौणिमेस, ग्रहणकाली, सिद शौदेवाने सर्व लोकांसमक्ष आपल्या गुरूनें स्थापित केलेल्या विद्यालयाला (गरूच्या) हातावर पाणी सोडून हीं उत्पन्नाची साधने दान दिली आहेत. अभ्यास :--१ या दानपत्रांतील शक कोणता? त्याचा सन काय येतो? । २. भास्कराचार्याबद्दल तत्कालीनांना इतका आदर कां वाटत होता ?