पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/118

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास करतां ? ' त्यावर दाहीर म्हणाला, 'तू जर वकील म्हणून आला नसतास तर तुझ्या या भाषणाबद्दल तुला मृत्यूचीच शिक्षा फर्मावली असती !' त्यावर मौलानाने उत्तर दिले, 'तुम्ही मला ठार मारले तर अरबांचे विशेष नुकसान होणार नाही, परंतु ते माझ्या मृत्युचा सूड मात्र उगवतील व या कृत्याबद्दल तुमच्यापासून दंड वसूल करतील.' अभ्यास:-१. मौलाना इस्लामीने दाहीरला नमस्कार का केला नाहीं? २. दहीरने मौलाना इस्लामीला शिक्षा का केली नाहीं ? ३. भिन्न भिन्न राजांचे वकील परदरबारों गेले तर त्यांना वागविण्याचे सामान्य संकेत कोणते त्यांची माहिती करून घ्या. २ ।। पेशावरच्या मैदानावर सुलतान महमूद चे राजा जयपाळ यांचे युद्ध [ पुढील उतारा अल्-उत्बीकृत ‘तारीख-इ-यामिनी' या ग्रंथांतून घेतला आहे. गझनीचा सुलतान महमुद हा याचे पदरीं होता. तो स्वतः हिंदुस्थानांत आलेला दिसत नाही, पण त्याला महमुदाचे बेत चांगले माहीत होते. त्याच्या ग्रंथांत इ स. १०२० पर्यंतच्या महमुदाच्या स्वा-यांची हकीकत तपशीलाने आढळून येते. अल्-उत्बीची ग्रंथ हिंदुस्थानच्या माहितीपेक्षा महमुदाच्या संकल्प-विचारावर विश्वसनीय प्रकाश पाडतो.-इ. व डौ. व्हॉ. २, पृ. २४.] । प्रथम सिजिस्तानकडे जाण्याचा सुलतान महमुदाचा विचार होता. परंतु त्याआधीं हिंदूविरुद्ध धर्मयुद्ध करण्याचा विचार त्यास अधिक पसंत पडला. आपल्या सल्लागारांचा सल्ला घेण्याच्या आधीच त्याने शस्त्रास्त्र वाटली. धर्माची ध्वजा फडकवावी, न्यायाचा प्रसार करावा, सत्याचे तेज पसरवावे नि ईश्वरी कृपा संपादावी असा त्याचा हेतु होता. सुलतान हिंदकडे निघाला तो ईश्वरावर पूर्ण विसंबून. ईश्वराने आपल्या प्रकाशाने त्यास मार्ग दाखविला आणि त्याच्याच सामर्थ्यावर सर्व स्वान्यांत त्याला विजय मिळाला. पेशावरला पोहोचल्यावर त्याने शहराबाहेर तळ ठोकला. तेथे २]