पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/119

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पेशावरच्या मैदानाववर सुलतान महमूद व राजा जयपाळ यांचे युद्ध ८७ त्यास कळलें कीं ईश्वराचा शत्रु आणि हिंदचा राजा जयपाळ याने विरोध करण्याचा निर्धार केला असून युद्धभूमीवर भवितव्याशीं मुकाबला करण्यासाठी म्हणून त्याने बरीच मजल मारली आहे. सैन्यांतील गुलाम, योद्धे, घोडे आणि हत्ती यांची नोंदपुस्तके त्याने पाहिली आणि त्यांतून १५०० घोडेस्वार, इतर माणसे नि अधिकारी निवडले ......ज्यांची निवड झाली नाहीं त्या सर्वांस सैन्याबरोबर येण्यास त्याने बंदी केली. हे निवडक सैनिक म्हणजे साक्षात् जंगलचे सिंह किंवा विजनवासी मृगदैत्यच होते. ......राक्षसी काफर आपल्या संख्येच्या व शस्त्रांच्या बळाने गवष्ठ होऊन सामोरा आला. त्याच्याजवळ १२,००० घोडेस्वार ३०,००० पायदळ व ३०० हत्ती इतकें सैन्य होते. त्यांच्या वजनाखालीच जणू पृथ्वी चेंगरली जात होती. पण त्याने असा विचार केला नाहीं कीं ईश्वराच्या प्रेरणेने लहान सैन्यसुद्धा मोठ्या सैन्याची धूळधाण उडवू शकते. * .......सुलतानाने त्याला अधिक वेळ दिला नाहीं. ईश्वराच्या मित्राने युद्धास एकदम सुरुवात केली. त्याने आपल्या शत्रूविरुद्ध बाण, तलवार, भाला यांचा उपयोग करून लूट व जाळपोळ करण्यासहि सुरुवात केली. यामुळे जागृत होऊन हिंदूनीहि धुमश्चक्रीचे युद्ध सुरू केले. या वेळी हिंदूनी आपल्या घोडेस्वारांच्या रांगा व्यवस्थित करून रणवाद्ये वाजविलीं. एकामागून एक असे रांगेत उभे राहून हत्तींनी चाल सुरू केली. । ......काळ्या ढगांतील विजेप्रमाणे तलवारी चमकू लागल्या. रक्तांचे पाट वाहू लागले. खुदाच्या खिदमतगारांनीं हट्टी विरोधकांचा पूर्णपणे धुव्वा उडविला. दुपार होण्यापूर्वीच मुसलमानांनीं काफिरांचा सूड घेतलेला होता. १५,००० लोकांना त्यांनी ठार मारले. ......ईश्वराचा शत्रु जो जयपाळ, तो आणि त्याची मुले, नातू व सरदार यांना दोरांनी बांधून सुलतानासमोर उभे करण्यांत आले. कांहींचे हात मागे बांधले होते तर काहींच्या मानेवर ठोसे मारले जात होते. ज्यपाळाच्या गळ्यामध्ये २० लक्ष दिनार' किंमतीचा सुवर्णमय आणि रत्नजडित हार होता तो काढून घेण्यांत आला. इतर सर्व कैद्यांच्या १. सोन्याचे नाणे. [३