पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/12

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५) ‘रोमँटिक' असते असा छाप मारणे अन्यायाचे होणार नाहीं. मुसलमानी कालांतील इतिहास हा घटनाप्रधान असण्यापेक्षां व्यक्तिप्रधान आहे. सर्व इतिहास वाचून अलाउद्दीन, महमद तुघ्लग, बाबर, अकबर, औरंगजेब या व्यक्तिमात्रांच्या स्वभावाचे ठसे वाचकांच्या मनावर उमटतात. मुसलमानी काळांतील ऐतिहासिक घटना म्हणजे या बादशाहांनी केलेली बरीं वाईट कृत्ये असा संस्कार वाचकांच्या मनावर उमटतो. या बखरवज़ा ग्रंथांखेरीज अस्सल मुसलमानी पत्रे व व्यापारी व्यवहाराची साधनें जमा होतील तर मुसलमानी इतिहासाच्या अभ्यासांतील बखरकाल मागे पडून व त्याचा रोमहर्षकपणा (रोमँटिकपणा) कमी होऊन ख-या लोक-इतिहासाच्या आकलनास साह्य होईल. तूर्त तरी हिंदुस्थानांतील विद्वान् म्हणविणारे इतिहास लेखकहि मुसलमानो कालखंडावावत या उद्योगास •लागलेले दिसत नाहींत. मुसलमानी इतिहासाचा कालखंड सोडून मराठी कालखंडांतील उता-यां- कडे नजर टाकल्यास तेथे निराळाच प्रकार जाणवतो. प्राचीन कालच्या अभ्यासांत अडणारा तुटकपणा येथे तितक्या प्रमाणांत आढळणार नाहीं. मराठेकालीन घडामोडीचे ढोबळ संगतवार चित्रण तयार होते, पण ते सर्व बखरोच्या आधारावर होते. पुराणिकबुवांनी आपल्या स्मृतीवर भरंवसा ठेवून वर्णन करावे किंवा आजीबाईंनी गोष्टी सांगाव्या व एखादी मोठी ऐतिहासिक घटना आवाक्यांत घेण्याचा वकूबच असू नये, सर्व नेमानेम ईश्वरी अवतारावर व योगायोगावर निश्चित असल्याचे ठरवून समाधान मानावे तसा सर्व प्रकार होता. या प्रकारांतून इतिहासाच्या अभ्यासकास झपाट्याने बाहेर काढून योग्य, तर्कशुद्ध विवेचनाच्या व साधनसंग्रहाच्या व साधनचिकित्सेच्या वळणावर आणून ठेवणाच्या रानडे-राजवाड्यांचे मराठी वाचकावरील उपकार शब्दानें वर्णन करण्यासारखे नाहींत. ज्या प्रचंड नेटाने व कर्तृत्वाने मराठ्यांनीं सतराव्या व अठराव्या शतकांत साम्राज्य उभारले त्या नेटाने व त्याहूनहि अधिक पद्धतशीर रीतीने इतिहासाच्या अभ्यासाचा प्रचंड व्याप मांडावयाचा असेल तर रानडे-राजवाड्यांनी त्याची तयारी करून ठेविली आहे. या कारणाने मराठ्यांच्या इतिहासांतील अतिरंजितपणा व वारेमाप वर्णन कमी होऊन वस्तुस्थितीचे त्रोटक व सावध वर्णन