पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/122

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६१ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास है दु दिला तर कोणी त्याचे म्हणणे अमान्य केले. अखेर सुलतानाची परवानगी घेऊन छताचे कांहीं दगड काढावयाचे ठरले. दोन दगड काढल्याबरोबर मूति एका बाजूस कलली ! आणखी दोन काढतांच ती आणखी त्या बाजूस कलली ! व पुन्हा आणखी दगड काढतांच ती अधांत्री मूत जमिनीवर आली !! | अभ्यास :---१. तत्कालीन बांधकामाच्या कौशल्याविषयी आपणास काय माहिती मिळते ? २. अधांत्री मूत ठेवणाराचे कौतुक करावें कीं तो जमिनीवर पाडणाराचे कौतुक करावे ? सकारण सांगा. ३. भारतीय लोक पूर्वीइतके आजहि भाविक आहेत काय ? पृथ्वीराजाचा जय आणि पराजय [ तवकत-इ-नासिरी या ग्रंथाचा लेखक मिन्हाजुस् सिराज हा इ. स. १२२७ चे सुमारास हिंदुस्थानांत आला. तो कांहीं दिवस अल्तमशचे पदरी होता. सुलताना रेझियाची कारकीर्दहि त्याने पाहिली. त्यानंतर तो इ. स. १२४२ चे सुमारास बंगालमध्ये लखनौती येथे राहिला. तेथून तो दोन वर्षांनी दिल्लीस आल्यावर त्यास नासिरिया विद्यालयाच्या मुख्याध्यापकाची जागा मिळाली. सुलताना रेझियानंतर आलेल्या नासिरुद्दीनच्या पदरीं राहून त्याने बरेंच लेखन केले असल्याने त्याने आपल्या ग्रंथास तबकत-इ-नासिरी हे नांव दिले आहे. या काळासंबंधींच्या इतिहास-लेखकास तबकत-इ-नासिरी हा ग्रंथ विश्वसनीय । वे आधारभूत वाटतो. प्रस्तुतचा उतारा याच ग्रंथांतून घेतला आहे. इ. व डौ. व्हॉ. २ पृ. २९५ पहा. पुढचा उतारा क्र. ६ हा त्याच ग्रंथांनील पृ. ३३२ वरचा आहे.] - सुलतान महंमद घोरीने पृथ्वीराजास' तरायन येथे तोंड दिले. हिंदुस्थानांतील सर्व राजे पृथ्वीराजाच्या बाजूने होते. दिल्लीचा गोविंदराज ज्या हत्तीवर आरूढ झाला होता त्यावर एका ।। १. पृथ्वीराजास लेखक रायकोलाह' किंवा 'पिठुरा' असे म्हणतो. १. २. तरायन शब्दाऐवजी फिरिस्ता ‘नरायन' असा शब्द वापरतो. तरायन स्थानेश्वराचे दक्षिणेस १३ मैलांवर सरस्वतीचे कांठीं आहे. २. ३. वरील विधान में लेखकाचे सर्वसाधारण विधान आहे. त्यांतील | बिनचूकपणा गृहीत धरता येणार नाहीं ६]