पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/124

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास मागे ठेविलें व शांतपणे तो पुढे पुढे चालू लागला. बिनचिलखती व अवजड साहित्य जवळ नसलेल्या १०,००० घोडेस्वारांच्या चार तुकड्या करण्यांत येऊन शत्रूवर मागून, पुढून, डाव्या व उजव्या म्हणजे सर्व बाजूंनीं बाणांचा वर्षाव करून शत्रूला भंडावून सोडण्याचा हुकूम त्याने दिला. शत्रूसैन्य एकत्रित होईल तेव्हां या तुकड्यांनी एकमेकांस साहाय्य करून त्यावर जोराचा हल्ला करावा अशी योजना होती. या युक्त्यांनीं काफिरांची हानि झाली. त्यांच्यावर ईश्वराने आम्हांस जय दिला आणि ते पळू लागले ! 1. पिठरा हत्तीवरून खाली उतरला व घोड्यावर स्वार होऊन भरधांव निघाला. पण सरसुती (सरस्वती) जवळ त्यास पकडून नरकास पाठविण्यांत आले. दिल्लीचा गोविंदराज लढाईत मारला गेला. त्याच्या पडलेल्या दोन दांतांवरून त्याचे मुंडके सुलतानाने ओळखलें. राजधानी अजमीर, शिवालिक टेकड्या, हन्सी, सरसुती व इतर जिल्हे सुलतानाच्या ताब्यांत आले. हा विजय हिजरी ५८८ (इ. स. ११९२) मध्ये त्यास मिळाला. | अभ्यास :--१. महंमूद घोरी यास कोणीं सांवरले? तो वांचल्याने त्याच्यावर नि सैन्याच्या मनावर काय परिणाम झाला ? २. कोणत्या युक्तीने पृथ्वीराजावर महमुदाने विजय मिळविला ? ३. तरायनाला हीं जी दोन युद्ध झाली त्यांचे वर्णन तुमच्या भाषेत करा. सुलताना झियाची योग्यता सुलताना रझिया थोर राजकर्ती होती. ती शहाणी, न्यायी व उदार असून तिचे वर्तन राज्याला उपकारक असे. न्याय द्यावा, प्रजेचे रक्षण करावे व सैन्याच्या अग्रभागी राहावे हा तिचा देहस्वभाव होता. सारांश, राजाला शोभणारे सर्व गुण तिच्यांत होते, परंतु ती स्त्री देहांत जन्माला आली म्हणून (तिच्या भोवतालच्या) पुरुषांच्या मते हे तिचे सर्व गुण व्यर्थ होते ! तिचे वडील जिवंत असतांना तिने आपला अधिकार उत्तम प्रकारे चालविला होता. तिची आई राजाची पट्टराणी होती. 'कुझ्क-इ-फिरोझी' येथील मुख्य राजवाड्यांत ती राहात असे. सुलतानाने तिचे शौर्य व अधिकार गाजविण्याची ढब ओळखली होती. मुलगी असल्याने ती सार्वजनिक जीवनांत ८]