पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/126

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

:९४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास लिहिदांना याचा आधार घेतला, पण दुसरेहि आधार घेतले आहेत. , दरबारांत सुलतानाच्या आश्रयाला बसून लिहिणारा हा लेखक महंमद • तुघ्लखाचीं दुष्कृत्ये स्पष्टपणे कशी सांगेल ? इ. व डौ. व्हॉ. ३, पृ.१७९] ........नंतर बंडाळी थांबविण्याकडे सुलतानाने लक्ष देण्यास सुरुवात केली. पहिला उपाय म्हणूस त्याने मालमत्ता जप्त करण्याचे योजिलें. मिरासी हक्कानें, दानपत्रानें अगर घाभिक कारणासाठीं जो जमीनजुमला दिला गेला असेल तो लेखणीच्या फटका-याने त्याने सरकारजमा केला ! शक्य त्या उपायांनी लोकांकडून तो पैसे उकळु लागला. या कारणाने स्वतःच्या रक्षणास लागणारा पैसा मिळविण्यांत लोक इतके गुंतले कीं, बंडाळीचा प्रादुर्भावच अशक्य झाला. नंतर अलाउद्दिनाने गुप्त पोलिसांचे सर्वत्र असे जाळे पसरलें कीं, लोकांनी चांगलें अगर वाईट कांहीं केले तरी ते त्यास तेव्हांच समजे. सरदार दरकदारांच्या घरांत काय चालले आहे याचीहि माहिती त्यास मिळे, व त्याबरहुकूम तो त्यांना जाब विचारी. हा ससेमिरा इतका कडक होता की, मनसबदारांना आपल्या घरांत एकमेकांकडे खुणा करून बोलण्याचा प्रसंग येई. रात्रंदिवस त्यांना आपल्यावरील गुप्त पहाण्याची दहशत वाटे. सार्वजनिक ठिकाणी ज्या गोष्टी घडत त्याबद्दल तर ताबडतोब चौकशी होऊन शिक्षा केली जाई. . तिसरा उपाय म्हणजे दारू पिणे वा विकणे, अफू, गांजा ओढणे, चूत खेळणे इत्यादि गोष्टींना आपल्या राज्यांत त्याने बंदी केली. सुलतानाने ‘स्वतःच्या मद्यविलासाची सर्व उपकरणे मोडून तोडून फेकून दिली व स्वतःहि दारू पिणे सोडले. चोरून दारू पिणारे, गाळणारे व विकणारे यांना शोधून काढण्यास त्याने तपासनीस नेमले. दारू हाती लागल्यास ती हत्तींना पाजावी, अपराध्यांना फटक्यांची शिक्षा द्यावी, तुरुंगात टाकावे, किंवा जमिनीत खड्डे खणून त्यांत रुतवून ठेवावे असा प्रकार चाले.. या शिक्षेच्या भीतीने कित्येकांनी दारू पिणे सोडून दिले. अभ्यास :--१. दारुबंदी करण्यासाठीं अलाउद्दिनाने कोणते उपाय योजले ? त्यासाठी सध्यांचे सरकार काय उपाय योजीत आहे ? २. अलाउद्दिनाने प्रजेची बंडखोरवृत्ति कशी ताब्यात आणली ? हे उपाय -योग्य की अयोग्य यावर चर्चा करा. १०]